शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara Bus Accident : तुळसणीच्या सुपुत्रावर मायभूमीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:17 IST

पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला. येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देतुळसणीच्या सुपुत्रावर मायभूमीत अंत्यसंस्कारमुलीच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे

देवरूख : पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला. येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अपघातातील मृतांमध्ये तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील हेमंत सुर्वे यांचा समावेश आहे. सुर्वे यांचा मृतदेह रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मृतदेह हाती लागला. मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी सुर्वे कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.दरम्यान, सायंकाळी ४ वाजता येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी, तुळसणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच सुर्वे यांची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.सामाजिक योगदानही...हेमंत सुर्वे यांना सामाजिक कार्याची आवड होती. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याकरिता ग्रामविकास समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचे हेमंत सुर्वे हे अध्यक्ष होते. गावात सलोखा कायम राहावा, यासाठी सुर्वे यांनी गावची निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन ग्रामपंचायत निवडणूक सुर्वे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बिनविरोध केली.ग्रुपवर अखेरचा मेसेजसोशल मीडियाच्या माध्यमातून आता विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कार्यरत आहेत. हेमंत सुर्वे यांचा महाविद्यालयीन बॅचचा ग्रुपदेखील आहे. या ग्रुपमध्ये शनिवारी सकाळी हेमंत यांनी टाकलेला गुड मॉर्निंगचा मेसेज अखेरचा ठरल्याचे ग्रुपमधील सदस्यांनी भावनाविवश होताना सांगितले.मुलीच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरेहेमंत सुर्वे यांना एकुलती एक मुलगी आहे. तिला उच्च पदस्थ अधिकारी करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने त्यांनी पुढील पावलेही उचलली होती. मात्र, सुर्वे यांची ही इच्छा त्यांच्या मनातच राहिली आहे.माझी वाट पाहू नकाशनिवारपाठोपाठ रविवारी सुट्टी असल्याने हेमंत सुर्वे हे तुळसणी येथे येणार होते. मात्र, कर्मचारीवर्गाने महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला. यात सुर्वेदेखील सहभागी झाले. त्यांनी आपल्या कुटुंबियांना माझी वाट पाहू नका, असे भ्रमणध्वनीवरून सांगितले.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी