शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शशिकांत वारिसे मृत्यू; पंढरीनाथ आंबेरकरवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, रत्नागिरीतील पत्रकार आक्रमक

By अरुण आडिवरेकर | Updated: February 10, 2023 17:21 IST

शशिकांत वारिसेच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांनी केलेल्या बातमीचा राग मनात ठेवून त्यांच्या दुचाकीला धडक देवून त्यांची हत्या  झाल्याच्या घटनेचा रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुकनिदर्शने करुन निषेध केला. हत्येला दोषी असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला कडक शिक्षा करा अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी  शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणार् या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू  झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे . शशिकांत वारिसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली, ते कार चालक पंढरीनाथ आंबेरकर होते.सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू  होतो. हा केवळ  योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र  शब्दात निषेध करीत असल्याचे सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत  व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पत्रकारांनी केली. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र  आंदोलन करावे लागेल असा इशारा पत्रकारांनी शासनाला दिला आहे.यावेळी  रत्नागिरीतील पत्रकारांनी आपल्या परखड प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला शिक्षा होईल या पद्धतीचा तपास पोलीस यंत्रणेने करावा अशी मागणी करण्यात आली. तर राज्य शासनानेही अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात कायद्याचा धाक वाटावा असे वातावरण निर्माण करणे शासनाची जबाबदारी आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी पत्रकरांच्यावतीने करण्यात आली. यावेळी  विविध संघटनांचे पदाधिकारी,सदस्य, पत्रकार उपस्थित होते. तर काँग्रेसच्यावतीने अश्विनी आगाशे, रुपाली सावंत, रिझवाना शेख यांनी आंदोलनात सहभागी होऊन हत्येचा निषेध केला.शशिकांत वारिसेच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावीरिफायनरी प्रकल्पाच्या दोन बाजू आहे. समर्थन व विरोध असे आमने-सामने असताना वृत्तपत्रांना दोन्ही बाजू समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. शशिकांत वरिसे आपल्या वृत्तपत्रातून आपले काम करत होते. असे असताना विरोधात बातमी आली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे  त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातJournalistपत्रकार