शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: तीस हजारांची लाच स्वीकारताना राजीवलीचे सरपंच, उपसरपंच लाचलुचपतच्या जाळ्यात

By शोभना कांबळे | Updated: May 11, 2023 16:56 IST

कंत्राटदाराच्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच

रत्नागिरी : कंत्राटदाराच्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना राजीवलीचे (ता. संगमेश्वर) सरपंच आणि उपसरपंच यांना रत्नागिरीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळा रचून ताब्यात घेतले.तक्रारदार हे कंत्राटदार असून  मित्राच्यावतीने राजीवली ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील पाखाडी तयार करण्याचे काम त्यांनी केले होते. या कामाचे बिल व सध्या पूर्ण झालेल्या कामांचे बिल ग्रामपंचायतीकडून मंजूर व्हायचे होते. मात्र, या बिलांच्या मंजुरीसाठी राजीवलीचे सरपंच प्रशांत शिर्के,आणि उपसरपंच सचिन पाटोळे यांनी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी ४० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. या रक्कमेपैकी १५ हजार रूपये सरपंच प्रशांत शिर्के याला व १५ हजार उपसरपंच सचिन पाटोळे याला गुरूवारी देण्याचे ठरले.रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंध विभागाला ही माहिती मिळताच लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार प्रत्येकी १५ हजार रूपये घेत असताना या दोघांनाही रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० हजार रूपये हस्तगत करण्यात आले असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईत पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, प्रवीण ताटे, सहायक पोलिस फाैजदार संदीप ओगले, हवालदार विशाल नलावडे, महिला पोलिस हवालदार श्रेया विचारे, पोलिस नाईक दीपक आंबेकर, शिपाई राजेश गावकर व चालक प्रशांत कांबळे यांचा समावेश होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी