शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:16 IST

श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.

ठळक मुद्देनळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनीइतरांसमोर एक वेगळा आदर्श

देवरुख : श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.तालुक्यातील मानसकोंड हे गाव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. गावात यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. मात्र, देवरुख येथील मातृमंदिर संस्थेचे तत्कालिन कार्याध्यक्ष कै. भाऊ नारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच या वाडीतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला आहे. विजय नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसमिती फेपडेवाडीने लोकसहभाग आणि देणगीदारांच्या सहकार्यातून २५ जानेवारी २००९ रोजी वाडीतील ८० कुटुंबांना नळपाणी योजना कार्यान्वित केली.गावाची एकी असेल तर कोणतेही काम सहज करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही फेपडेवाडी होय. या वाडीने एकत्र येत महिलांना करावी लागणारी पाण्यासाठीची पायपीट थांबविली आहे. यामध्ये स्थानिकांसह मुंबईस्थित ग्रामस्थांबरोबरच तरुणांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. इतर शासकीय योजनांपेक्षा या वाडीने श्रमदानातून केलेली ही योजना दहा वर्षे अखंडितपणे सुरु आहे. या योजनेच्या देखभालीचे काम स्थानिक ग्रामस्थच करीत असतात.दहा वर्षे झाल्यामुळेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि दि. १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा श्रमदानातून हे काम करण्यात आले. अनेक ठिकाणचे जॉईट्स बदलण्यात आले आहेत. प्रारंभी असलेला उत्साह आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. योजनानिर्मितीचा उत्साह, जोश जसा होता तसाच आजही दुरुस्तीकामी श्रमदानातून दिसून येतो आहे. गावाच्या विकासासाठी नियोजनबध्द केलेले श्रमदान गावच्या विकासास हातभार लावणारे ठरत आहे.पाणीटंचाई केली दूरमानसकोंड फेफडेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गणुजी फेपडे तसेच पाणी कमिटी व सर्व वाडीतील स्थानिक मुंबईकर यांचे सतत सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच गेली अकरा वर्षे ८० कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणे सहजशक्य झाले आहे. या वाडीने लोकसहभाग आणि श्रमदानाने या योजनेची दुरूस्ती केली असून इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी