शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

९६९ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:24 IST

जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांनी जिल्ह्यातील १३ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १ कोटी १६ लाख रुपये खर्च करुन सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात येणार आहेत़

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या दोन विभागांचा पुढाकार जिल्हा वार्षिक योजनेमधून करणार १ कोटी १६ लाखांची तरतूद

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांनी जिल्ह्यातील १३ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १ कोटी १६ लाख रुपये खर्च करुन सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात येणार आहेत़आरोग्याची काळजी कशी घ्यावी व मासिक पाळीच्या काळात काळात काय काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थिनींना शाळांमध्येच शिक्षक तसेच आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते़ काही माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीनच्या मशीन बसविण्यात आल्या आहेत़ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन मोफत देण्यात येतात, तर काही शाळांमध्ये ५ रुपये घेऊन सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येते़विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन मोफत देता यावेत, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही मंजूरी घेण्यात आली आहे़ तयासाठी १ कोटी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़ जिल्ह्यात इयत्ता पाचवीपासून पुढील इयत्तांमधील विद्यार्थिनी असलेल्या ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १३ हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थिनींना आरोग्य विषयक माहितीही शिक्षकांकडून देण्यात येत आहे़ खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेमध्ये तर एका शिक्षिकेने स्वत: विद्यार्थिनींसाठी खोली तयार केली आहे़ मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनही मोफत देण्यात येत आहे़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनची सोय करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत़ त्यासाठी एका शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविणेसाठी सुमारे १२ हजार रुपये खर्च येणार आहे़ जिल्हा परिषदेकडून नाविन्यपूर्ण योजनेतून खरेदी करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे़आरोग्याच्या स्वच्छतेसाठीकिशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात़ त्यात मासिक पाळी सुरु होणे, हा महत्त्वाचा टप्पा आहे़ त्यात योग्य माहितीच्या अभावी मुलींना मासिक पाळी सुरु झाल्यानंतर नैराश्य येणे, उदासीनता येणे, शारीरिक अस्वच्छता व त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत असलेल्या अज्ञानामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

ग्रामीण भागामध्ये अज्ञानाच्या कारणाने किशोरवयीन मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो़ तसेच या काळात स्वच्छता न ठेवल्याने आजारांना सामोरे जावे लागते़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन घेऊन त्याद्वारे सॅनिटरी पॅड पुरविण्याचा निर्णय घेतला आहे़

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी