शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
7
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
8
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
9
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
10
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
12
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
13
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
14
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
15
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
16
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
17
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
18
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
20
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: साफ यिस्ट कंपनीला उत्पादन बंदची नाेटीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:53 IST

विजेसह पाणीपुरवठा खंडित करण्याचेही आदेश

चिपळूण : गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफ यिस्ट कंपनीचे सांडपाणी टँकरद्वारे कामथे धरणात सोडल्याच्या प्रकाराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. एमपीसीबीने साफ यिस्ट कंपनी व्यवस्थापनाला उत्पादन बंदची नोटीस बजावली आहे. याशिवाय कंपनीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरण व एमआयडीसीला देण्यात आले आहेत.मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कामथे धरणामध्ये २१ जून राेजी टँकरचे पाइप पाण्यात सोडून मळीसदृश सांडपाणी धरणात सोडल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीला आणला हाेता. याप्रकरणी टँकरचालकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एमपीसीबीने येथील पाण्याचे नमुने घेतले असून, चिपळुणातील अधिकारी कुलकर्णी यांनी याबाबत कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे माहिती दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील एमपीसीबीचे विभागीय अधिकारी निखिल घरत यांनी साफ यिस्ट कंपनीला उत्पादन बंदची नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार, पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९७४ नुसार उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वारंवार अशा घटना घडत असून, त्यामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाल्याचा ठपका एमपीसीबीने ठेवला आहे. त्यानुसार उत्पादन सुरक्षितपणे थांबविण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत. याशिवाय महावितरणचे कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना वीज आणि पाणी खंडित करण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी या आदेशांचा पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.एमपीसीबीला आढळल्या त्रुटीसाफ यिस्ट उद्योगाने मंडळाच्या परवानगीशिवाय जास्त पाणी वापरले आहे. तसेच परवानगीशिवाय बॉयलर इंधन नमुना बदलला आहे. बॉयलरला दिलेला बॅग फिल्टर सुस्थितीत आढळला नाही. टँकरद्वारे सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे प्रदूषण झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचे व्यवस्थापनाने पालन केलेले नाही. त्यामुळे साफ यिस्ट कंपनीला दोषी ठरविण्यात येत आहे.