शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी तपासणी नाक्यावर तो एस्. टी. सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:23 IST

चेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णणावाहिकेने तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर कार्यरत एस्. टी. बसने क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी नेले जातेअचानक छातीत दुखू लागल्याने रस्त्यावर कोसळलेएस्. टी. कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील कशेडी येथे सुरु करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या एका एस्. टी. कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नितीन नलावडे (३२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.मुंबई, पुणे यासारख्या रेडझोनमधून कोकणात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे तपासणी नाका सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याकडून मुंबई पुणे, ठाणे येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना चेकनाक्यावर तैनात ठेवलेल्या एस्. टी. बसने क्वॉरंटाईन सेंटरवर नेऊन १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले जाते.नितीन नलावडे हे एस्. टी. चालक हेच कर्तव्य बजावण्यासाठी मंगळवारी रात्री कशेडी येथे कर्तव्यावर होते. बुधवारी सकाळी ६.१० वाजण्याच्या सुमाराला तो मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांना घेऊन लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या क्वॉरंटाईन सेंटरकडे निघाला होता. तो एस्. टी. सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले.वेदना असह्य झाल्याने तो एस्. टी. तून खाली उतरला. मात्र, त्याला उभे राहणे शक्य न झाल्याने रस्त्यातच आडवा झाला. चेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णणावाहिकेने तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले. खेड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू