शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:03 IST

Grampanchyat Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.

ठळक मुद्देअर्ज दाखल करण्यासाठी झुंबड, उमेदवारांची धावपळतीन दिवसांच्या सुट्टीनंतर कार्यालये सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी कार्यरत असली तरीही अद्याप स्थानिक पातळीवर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यातच आता भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, २५ डिसेंबर रोजी आलेली नाताळची सुट्टी त्याला जोडून आलेला शनिवार, रविवार यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करता आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने गर्दी उडाली आहे. सुट्टीत ऑनलाईन सेवा देणारी केंद्र सुरू ठेवल्याने इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. सोमवारपासून तहसील कार्यालयात हे अर्ज दाखल झाले आहेत.कागदपत्रांसाठी दमछाकनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तब्बल १६ ते १७ कागदपत्र जमविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच तीन दिवस सुट्टया आल्याने कागदपत्रे गोळा करता आलेली नाहीत. आता कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी