शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आरोग्यासह शाळेसाठी एक धाव, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 11:50 IST

मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता.

ठळक मुद्देआरोग्यासह शाळेसाठी एक धाव, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मंडणगड - एलबीएसएच विद्यार्थी मंचातर्फे मॅरेथॉन स्पर्धा

मंडणगड : तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम १८ वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धकांनी धाव घेतली. त्यानंतर उर्वरित १८ वर्षापर्यंत व १४ वर्षाखालील गटांची स्पर्धा सुरु झाली.

या स्पर्धेसाठी दहागाव ते विसापूर असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. स्पर्धकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. धुक्यातून धावणारे स्पर्धक रंगीत जर्सीमुळे आकर्षक दिसत होते.या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी मंचचे अध्यक्ष सुभाष तांबे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अभिजित गांधी, सचिव दीपक गोरिवले, सहसचिव नरेश चव्हाण, खजिनदार मनोज वेदक, सहखजिनदार नंदकुमार दळवी व अन्य पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

यावेळी डॉ. भावठाणकर, सभापती राजेश गुजर, राजेंद्र फणसे, सुभाष तांबे, अ‍ॅड. अभिजित गांधी, विनोद दळवी, बी. जे. पाटील, एस. बी. पाटील, दादा जगताप, दिलीप मराठे, विद्यार्थी मंचचे पदाधिकारी, शिक्षक, स्पर्धक उपस्थित होते.स्पर्धेतील विजेते पहिले तीन क्रमांकया स्पर्धेत १८ वर्षावरील खुल्या गटात पुरुषांमध्ये अविनाश पवार, सिद्धेश भुवड, मधुर चांदीवडे तर महिलांमध्ये स्नेहल माळी, स्नेहा दुसार, आश्विनी महागावकर, १८ वषार्खालील पुरुष गटात - रितेश नांगले, आशिष बेर्डे, प्रथमेश पारदुले, महिलांमध्ये रोहिणी पवार, सुचिता पवार, पिंकी हिलम, १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आदित्य गोठल, रितेज खांबे, सुजल लोखंडे तर मुलींमध्ये कोमल राठोड, वेदिका सकपाळ, आयेशा बोथरे यांनी यश मिळवले. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनRatnagiriरत्नागिरी