शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

साखरी नाटे जेटीसाठी ११८ कोटी मंजूर, काम सुरू; मत्स्य व्यवसायाला मिळणार नवसंजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:31 IST

राजापूर : तालुक्यातील साखरी नाटे येथे मत्स्य बंदर व्हावे अशी येथील मच्छीमार बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती मान्य ...

राजापूर : तालुक्यातील साखरी नाटे येथे मत्स्य बंदर व्हावे अशी येथील मच्छीमार बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती मान्य होऊन शासनाने नाबार्डअंतर्गत ११८ कोटी रुपये निधी मंजूर करून साखरी नाटे जेटीला मान्यता दिली आहे. आता या जेटीचे काम सुरू झाले असून, विविध सुविधांनी सुसज्ज अशी ही जेटी होणार आहे. यामुळे परिसरातील मत्स्य व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे बंदर म्हणून साखरी नाटे गावाची ओळख आहे. पर्ससीननेट मासेमारीसह, पारंपरिक पद्धतीनेही येथे मासेमारी केली जाते. येथील मच्छीमारांना आणि मच्छी विक्रेत्यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी धाऊलवल्ली-साखरी नाटे-आंबोळगड या संपूर्ण सागरी पट्ट्यामध्ये भव्य अशी मच्छीमार जेटी म्हणजेच बंदर मंजूर करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार साखरी नाटे येथील नियोजित बंदराच्या कामांमध्ये मच्छीमारांसाठी जाळे विणण्यासाठी शेड, संरक्षक भिंत, स्लीपिंग सॉफ्ट, बीच लँडिंग, मासळी लिलाव गृह, मत्स्य नौका दुरुस्तीसाठी लागणारी गीअर शेड, प्रशासकीय इमारत, उपाहारगृह, विश्रांती गृह, बोट दुरुस्तीसाठी कव्हर शेड, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर, स्वच्छतागृह ३, चौकीदार कक्ष, पार्किंग एरिया, संपूर्ण जेटी परिसरात दिव्यांची व्यवस्था, पाणी योजना, सांडपाणी निचरा व प्रक्रिया व्यवस्था, अग्निशामक व्यवस्था, अशी कामे करण्यात येणार आहेत. खाडीपात्रात गाळही काढला जाणार आहे.याठिकाणी तीन जेटी, रेडिओ टॉवर, मासे उतरवण्यासाठी ७४० मीटरची जेटी, जाळे विणण्यासाठी सुविधा याचा समावेश आहे. साखरी नाटे बंदरासाठी जवळपास १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातील प्रत्यक्ष रक्कम ११८ कोटी रुपये या प्रत्यक्ष जेटीच्या कामासाठी खर्ची केले जाणार आहेत.

सीआरझेडचीही मान्यता

या जेटीचा आराखडा मत्स्य विभागाने केला असून, कामाची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे देण्यात आली आहे. जेटी करता आवश्यक असलेली सीआरझेडची मान्यताही मिळाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFishermanमच्छीमार