शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदावर रोशन फाळके, विषय समिती सभापती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:49 IST

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर रोशन फाळके यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. तसेच विषय समिती सभापतींची निवडही बिनविरोध ...

ठळक मुद्देरत्नागिरी उपनगराध्यक्ष पदावर रोशन फाळके, विषय समिती सभापती बिनविरोधमताधिक्य देणाऱ्या प्रभागांची चर्चा मागे, ठरलेल्या चेहऱ्यांनाच दिली संधी

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर रोशन फाळके यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. तसेच विषय समिती सभापतींची निवडही बिनविरोध झाली. सर्वच विषय समिती सभापतीपदांवर शिवसेनेच्या नगरसेवकांची निवड झाली. विरोधात कोणीही अर्ज भरला नाही.रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापतीपदांवर कोणाला संधी मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांबरोबर अटीतटीची निवडणूक झाली. त्यात शिवसेनेचे बंड्या साळवी यांनी बाजी मारली.

मात्र, यावेळी कोणत्या प्रभागात शिवसेनेला किती मतदान झाले, यावरून सभापतीपद कोणाला द्यायचे हे ठरविले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. मात्र, ज्यांची नावे चर्चेत होती त्यांना सभापतीपदे मिळाली आहेत.विषय समिती सभापतीपद आणि समिती सदस्य निवडणुकीची प्रक्रिया बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली. यावेळी आरोग्य सभापती म्हणून राजन शेट्ये, बांधकाम सभापती म्हणून रशिदा गोदड, नियोजन सभापती म्हणून सुहेल मुकादम, महिला बालकल्याण सभापती म्हणून कौसल्या शेट्ये व पाणी सभापती म्हणून विकास पाटील यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. त्यांच्या विरोधात अन्य कोणाचेच अर्ज न आल्याने या सर्वांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी