शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखात पिस्तुलाचा धाक दाखवून घरावर दरोडा, पाच लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 17:46 IST

Crimenews Ratnagiri Police : घरावर दरोडा टाकून पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे ५ लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि वस्तू चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरे या भागात घडली.

ठळक मुद्देपाच कोटीच्या खंडणीची मागणी धाडसी दरोड्याच्या घटनेने तालुका हादरला

देवरुख : घरावर दरोडा टाकून पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे ५ लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि वस्तू चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या कांजीवरे या भागात घडली.

दरोडेखोरांनी नुरल होदा मशहुर अली सिद्दिकी यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करुन पलायन केले. दरोड्याच्या या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार नुरल सिद्दिकी यांचा देवरुख नजीकच्या कांजीवरा येथे भंगार व्यवसाय असून, तेथेच ते वास्तव्याला असतात. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तिंनी नुरुल यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.

नुरुल यांना चाहूल लागताच चारही दरोडेखोरांनी नुरुल यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नुरुल यांच्यासह त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून बेडरुममध्ये प्रवेश केला. स्क्रू ड्रायव्हरने लोखंडी कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आदी सुमारे ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा माल चोरुन नेला.नुरुल सिद्दिकी यांचा भाचा असादउल्ला याच्या तोंडाला दरोडेखोरांनी चिकटपट्टी लावली आणि सर्वांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आणि दरोडेखोरांजवळ पिस्तूल असल्यामुळे सिद्दिकी कुटुंब घाबरून गेले होते. तोंडाला कपडा बांधलेला असल्यामुळे दरोडेखोरांचे चेहरे नुरुल यांना नीट दिसले नाहीत.

दरोडेखोरांनी पाच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा करताना नुरुल यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटींची खंडणी देण्याची मागणी केली आहे. या घटनेने घाबरलेल्या नुरुल सिद्दिकी यांनी सकाळ होताच देवरुख पोलीस स्थानक गाठले आणि दरोड्याबाबत देवरुख पोलिसांना माहिती दिली. देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.नुरुल सिद्दिकी यांच्याकडून पोलिसांनी दरोडेखोरांचे वर्णन, त्यांची भाषा, उंची आदी माहिती घेतली आहे. श्वान पथकानेही घटनास्थळी येऊन माग काढला. मात्र, दरोडेखोर वाहनातून आले असल्याने अधिक माग काढणे शक्य झाले नाही.

या दरोड्याच्या तपासासाठी ठसे तज्ञही दाखल झाले होते. या दरोड्याच्या अत्यंत बारकाईने आणि वेगाने तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. दरम्यान, या दरोड्याच्या प्रकारानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस