शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा दिसल्यास कारवाई करणार - वाहतुकीला परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:30 IST

रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, ...

ठळक मुद्देवाहतूक निरीक्षक अनिल विभुते यांची माहिती

रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही रस्त्यावर रिक्षा फिरताना दिसत असून, रस्त्यावर रिक्षा दिसल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिला आहे.सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणण्यात आली आहे. आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकाने स्वयंशिस्तीने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नियमांमध्ये शिथिलता आणताना काही कडक निर्बंधही घालण्यात आले आहेत.

शासनाने नवीन नियमानुसार चारचाकी वाहनातून चालक आणि त्याचे सोबत अन्य दोन प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच दुचाकीवरून केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकते, असे सांगण्यात आले आहे.सोमवारी नियम शिथील केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांसह वाहनांचीही गर्दी दिसत होती. त्यातच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये टॅक्सी आणि कॅब यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आल्याने रिक्षा व्यावसायालाही परवानगी दिल्याचा अनेकांनी समज करून घेतला. त्यामुळे सोमवारी अनेक रिक्षाचालकांनी आपली वाहने रस्त्यावर आणली होती. गेले दीड महिन्यापासून व्यवसाय बंद ठेवून राहिलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसायाला पुन्हा सुरूवात केली. मात्र, त्यांना कारवाईचा सामना करावा लागला.याबाबत पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले की, रिक्षा व्यवसासाला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही रिक्षा रस्त्यावर आणू नये. रिक्षा रस्त्यावर फिरताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण