शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आजपासून महसूल सप्ताह, रांगोळी स्पर्धांमधून शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी 

By शोभना कांबळे | Updated: August 1, 2023 16:33 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत असून, सोमवारी रांगोळी स्पर्धेमधून शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला जाणार असून, या कालावधीमध्येही विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत. सोमवारी महसूल दिनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आदींमध्ये दिसून येत हाेती.महसूल सप्ताहानिमित्त सोमवार, दि. ३१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १ ऑगस्ट रोजी महसूल दिनी महसूल कर्मचारी संघटना सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. महिला सन्मान बचत पत्र कॅपही आयोजित केला आहे. अल्पबचत सभागृहात दुपारी ४ वाजता जिल्ह्यातील उत्कृष्ट महसूल अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचाही सत्कार होणार आहे.२ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रलंबित दाखले निकाली काढून त्यांचे वितरण होणार आहे. तसेच विविध दाखले-प्रमाणपत्रे यांची माहिती विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये दिली जाणार आहे. ३ रोजी ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना लाभ देण्याबाबत कार्यवाही होणार आहे.४ रोजी जनसंवादात विविध स्तरांवरील नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. ५ रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीचे प्रलंबित दाखले आणि प्रमाणपत्रे तत्काळ निकाली काढली जाणार आहेत. तसेच शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रलंबित जमीन वाटपाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.६ रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्या समस्यांवर आधारित उपक्रम असून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या तत्काळ मार्गी लावल्या जाणार आहेत. ७ रोजी महसूल सप्ताहाची सांगता होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी