शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

खाऊगल्लीतील व्यावसायिकांवर निर्बंध, रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:30 IST

Ratnagiri Nagar Parishad - खाऊगल्लीतील एका व्यावसायिकाने नगरसेवक आणि पदाधिकारी हप्ते घेतात, असे आरोप केले होते. यावर सर्वसाधारण सभेसमोर खाऊगल्ली कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव होता. त्यावर खाऊगल्लीत व्यावसायिकांवर निर्बंध लावण्याचा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देखाऊगल्लीतील व्यावसायिकांवर निर्बंध, रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत निर्णयप्रत्येक व्यावसायिकाला मिळणार ओळखपत्र

रत्नागिरी : खाऊगल्लीतील एका व्यावसायिकाने नगरसेवक आणि पदाधिकारी हप्ते घेतात, असे आरोप केले होते. यावर सर्वसाधारण सभेसमोर खाऊगल्ली कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव होता. त्यावर खाऊगल्लीत व्यावसायिकांवर निर्बंध लावण्याचा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.खाऊगल्लीतील व्यावसायिकांबाबतच्या निर्बंधाबाबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी माहिती दिली. खाऊगल्लीतील प्रत्येक व्यावसायिकाला ओळखपत्र, हातगाडी नंबर देण्यात येणार आहेत. तसेच खाऊगल्लीतील हातगाडी मालकाने हातगाडी भाड्याने दिली असेल तर ती गाडी तेथे व्यवसाय करण्यास पात्र नसेल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.मध्यवर्ती बसस्थानकासमोर आणि जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निर्बंध घालून काही वडापाव गाड्या करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, सर्व ठिकाणी स्वच्छतेची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही नगराध्यक्षांनी बजावले. यापुढे नगरसेवकांची बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची विनंती भाजप गटप्रमुख समीर तिवरेकर यांनी केली.अत्यावश्यक वस्तू, व्यवसाय, वैद्यकीय उपचारासाठी नगर परिषदेकडून आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी १० लाख २० हजार रुपये खर्चासाठी निधीला मंजुरी देण्यात आली. पाणी समिती सभापती दिशा साळवी यांनी नवीन नळपाणी योजनेच्या खुदाईमुळे अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या फुटून पाणीपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्यात अडथळा येतो. दोन टँकर भाड्याने घेण्याची सूचना केली.नगर परिषदेला दंडनागरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम २०१६ व पर्यावरणविषयक बाबींचे अनुपालन न झाल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराने राज्यातील नगरपरिषदांना दंड ठोठावला आहे. रत्नागिरी नगर परिषदेला या प्रकरणी आठ लाख रुपये दंड झाला आहे. तो भरण्याबाबतचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषदRatnagiriरत्नागिरी