शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद, २२ हजार मातांच्या बँक खात्यावर ९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:04 IST

Government Ratnagiri- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील २२ हजार ३४८ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभधारक मातांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतून ९ कोटी २० लाख ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री मातृवंदना योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद, २२ हजार मातांच्या बँक खात्यावर ९ कोटी माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागात योजनेला अधिक प्रतिसाद

रत्नागिरी : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील २२ हजार ३४८ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभधारक मातांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतून ९ कोटी २० लाख ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. मातेला सकस आहार मिळून सुदृढ बालक जन्माला यावे, यासाठी सन २०१७पासून ही योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यात ५ हजार रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीतही या योजनेची अंमलबजावणी करण्यास आरोग्य विभाग मागे राहिलेला नाही. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ३ हजार ९९९ मातांना १ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये इतके अनुदान पहिल्यांदा गरोदर व स्तनदा मातांना या योजनेंतर्गत देण्यात आले आहे.शहरी भागामध्ये २,४६५ मातांना ९९ लाख ६० हजार आणि ग्रामीण भागातील १९,८८३ मातांना ९ कोटी २० लाख ४५ हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे शहरांपेक्षा ग्रामीण भागात या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता आला आहे.सर्वच मातांना फायदापहिल्यांदा गरोदर असलेल्या मातांची नोंदणी व प्रसुती खासगी रुग्णालयात केली जाते. अशा मातांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी पहिल्या वेळेच्या गरोदर मातांनी पहिल्या १२ आठवड्याच्या आत नोंदणी करावी लागते. सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड आणि लाभार्थीचे राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते क्रमांक व माता बाल संरक्षक कार्डाची छायांकित प्रत ही कागदपत्रे देणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेRatnagiriरत्नागिरीGovernmentसरकार