शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:40 IST

बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत्नागिरीत बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.

ठळक मुद्देबौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषदसम्यक विश्व संघ डॉट इन संकेतस्थळाचे अनावरण

रत्नागिरी : बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत्नागिरीत बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सम्यक विश्व संघ यांच्यावतीने रविवारी पहिली जिल्हास्तरीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. महाथेरो (मिलिंद महाविद्यालय, मुळावा, जि. यवतमाळ) यांनी धम्मदेसना दिली. यावेळी त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म विविध जातक कथांनी स्पष्ट केला.महाउपासक बी. हरीनाथ यांनी जन्माला येणाऱ्या व्यक्तीला मानव घडविणारा बुद्धाचा धम्म असल्याचे सांगितले. दलित समाजातील हरीनाथ यांनी बुद्धाच्या धम्माचा अंगिकार कसा केला, याविषयी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. अतुल भोसेकर यांनी धम्मभाषा व धम्मलिपी यांचा परिचय करून दिला.

ते म्हणाले की, नवीन पिढीत धम्म रूजविण्यासाठी गाव तेथे विहार आणि विहार तेथे धम्म स्कूल होणे गरजेचे आहे. बौद्ध इतिहास अभ्यासक अशोक हंडोरे यांनी बौद्ध रंगभूमी या विषयावर बोलताना त्यातील ६४ कलांचा उल्लेख केला. सम्राट अशोक याच्या काळात उर्जितावस्था मिळालेल्या या कला केवळ मनोरंजनासाठी नाही तर धम्माच्या प्रबोधनासाठी उदयास आल्याचे त्यांनी सांगितले.बौद्ध लेणी व स्तूप अभ्यासक अशोक नगरे यांनी विविध ठिकाणच्या लेणी, स्तूप निर्मितीचा तसेच पुरातत्व शास्त्र याचा इतिहास विशद केला. याविषयीचा चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याने त्याच्या संशोधन क्षेत्रात अधिकाधिक बौद्ध बांधवांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक महेंद्र शेगावकर यांनी सम्यक संघ व त्याचे कार्य विशद करताना भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका याविषयी माहिती दिली. बुद्धाचे तत्वज्ञान मांडताना आजचे विज्ञान माहीत असावे, असे आग्रही मत त्यांनी मांडले.प्रा. मिलिंद कदम यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश कांबळे यांनी आभार मानले. धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी सम्यक विश्व संघाचे जनक धोत्रेकर, विवेक घाटविलकर, प्रा. मिलिंद कदम, राजेश कांबळे, प्रा. विकास कांबळे, सचिन कांबळे, प्रा. सुनील जोपळे यांनी परिश्रम घेतले.प्राचीन बौद्धांनी वसाहती केल्याची नोंदप्राचीन बौद्ध संस्कृती अभ्यासक गोपीचंद कांबळे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियर्समध्ये प्राचीन बौद्धांनी वसाहती केल्याची नोंद असल्याचे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा (ता. संगमेश्वर) याच्या नावामागचा बौद्धकालीन संदर्भ देत येथे बुद्धानी आपल्या शिष्यगणाला उपदेश केल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. यामुळेच येथील मूळ बौद्ध बांधवांचे आडनाव सकपाळ असल्याचे सांगितले.संकेतस्थळाचे अनावरणया धम्म परिषदेचे औचित्य साधून सम्यक विश्व संघ ही संस्था धम्म व समाजकार्याला समर्पित करण्यात आली तसेच सम्यक विश्व संघ डॉट इन या संकेतस्थळाचे अनावरणही भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले.तीन प्रमुख ठराव 

  1. - जाती प्रमाणपत्रावर बौद्ध अशी नोंद करून घेणे आणि येत्या जनगणनेत तशी नोंद करून घेणे.
  2. - रत्नागिरीतील थिबा राजवाड्यात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करणे व त्याअन्वये रत्नागिरी शहराची ओळख जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने तयार करणे.
  3. - भारतातील सर्वात उंच उभ्या बुद्धमूर्तीची स्थापना करून बौद्ध महाविहाराची निर्मिती करणे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा