शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'मनसे'च्या कार्यकारिणीत फेरबदल; रत्नागिरीतील राजापुरात नवनियुक्तीवरून फूट, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By अरुण आडिवरेकर | Updated: July 4, 2023 19:03 IST

नव्या कार्यकारिणीवरून मनसेमध्ये नाराजी

राजापूर : तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष अजिम जैतापकर यांच्या पाठोपाठ आणखी आठ पदाधिकाऱ्यांनी साेमवारी (३ जुलै) आपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नव्या कार्यकारिणीवरून मनसेमध्ये नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.मनसेच्या तालुकाध्यक्षपदी पंकज पंगेरकर यांची नियुक्ती करताना विद्यमान तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव यांची राजापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलानंतर मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष जैतापकर यांनी काही दिवसांनंतर आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोमवारी मनसेच्या तब्बल आठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे नूतन तालुकाध्यक्षांकडे सादर केले आहेत.राजीनामा दिलेल्यांमध्ये उपतालुकाध्यक्ष पुरुषोत्तम खांबल, राजाराम गुरव, विभाग अध्यक्ष अमोल सोगम, उपविभाग अध्यक्ष संकल्प तांबे, शाखाध्यक्ष विक्रांत बेनकर, मुकेश सोगम, रंगनाथ बारस्कर, उपशाखा अध्यक्ष दीपक घाडी यांचा समावेश आहे. वैयक्तिक व कौटुंबिक अडचणीमुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, तालुका कार्यकारिणीमध्ये फेरबदल करताना विश्वासात न घेतल्याने हे राजीनामा सत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसे