शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

संचितला ‘बालस्वास्थ सुरक्षा’ने दिले नवजीवन-: अंगणवाडी सेविकेच्या तत्परतेमुळे वेळीच मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:49 IST

दुर्मिळ आणि हृदयाचा अत्यंत क्लिष्ट  आजार असलेल्या खेड तालुक्यातील सवेणी गावातील संचित संजय निकम या तीन वर्षाच्या चिमुरड्याला अखेर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’तर्गत नवीन जीवन मि

ठळक मुद्देया संदर्भात प्राथमिक माहिती घेऊन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगावकर यांच्याशी संपर्क साधला.एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये १३ नोव्हेंबर रोजी यशस्वी आणि पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

खेड : दुर्मिळ आणि हृदयाचा अत्यंत क्लिष्ट  आजार असलेल्या खेड तालुक्यातील सवेणी गावातील संचित संजय निकम या तीन वर्षाच्या चिमुरड्याला अखेर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’तर्गत नवीन जीवन मिळाले.

संचित याला जन्मताच हृदयाचे चार क्लिष्ट व दुर्मिळ रोग जडले होते. त्याच्या हृदयाच्या रक्त्त वाहिन्या जन्मत:च चुकीच्या ठिकाणी प्रत्यारोपित झाल्या होत्या. हृदयाच्या झडपाना  दोन छिद्र्रे  होती.  त्याच्या हृदयाची जी नलिका जन्मानंतर बंद होणे गरजेची होती, ती उघडीच होती. अत्यंत क्लिष्ट अशी परिस्थिती घेऊन संचितचा जन्म झाला होता. अतिशय दुर्मिळ असा आजार घेऊन जन्माला आलेल्या संचित निकम या ३ वर्षीय चिमुरड्याला राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रमांतर्गत  नवीन जीवन मिळाले. तालुक्यातील सवेणी येथील संजय निकम हे  रोजगारासाठी  मुंबई येथे आपल्या कुटुंबियांच्या उदरनिवार्हासाठी मोलमजुरीचे काम करतात.

संचितवर उपचार करण्यासाठी वडिलांनी मुंबई येथील अनेक रुग्णालयात दाखवले मात्र लाखोंचा खर्च असलेली शस्त्रक्रिया आर्थिकदृष्टया त्यांना परवडणारी नव्हती.  हतबल झालेल्या कुटुंबियांचा  संपर्क  गावातील  अंगणवाडी सेविका शिंदे यांच्याशी झाला. त्यांनी  या संदर्भात प्राथमिक माहिती घेऊन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगावकर यांच्याशी संपर्क साधला. 

डॉ. संजीव धारिया, डॉ. सावन, डॉ. पालकर, डॉ वाघमारे यांनी संचितवर कराव्या लागणाºया शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेतले. यानंतर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’अंतर्गत मुंबई येथील हाजीअली येथील  एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये १३ नोव्हेंबर रोजी यशस्वी आणि पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण भागात तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया एका अंगणवाडी सेविकेने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे संचितवर यशस्वी व मोफत उपचार योग्यवेळी होण्यास मदत झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल