शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील लाल मातीत स्ट्रॉबेरी, कृषी विद्यापीठाचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:14 IST

- शिवाजी गोरे दापोली- कोकणातील लाल मातीतसुद्धा उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हा प्रयोग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या शात्रज्ञानी यशस्वी केला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख असून, या थंड वातावरणात आपण आजपर्यंत शेकडो एकरची स्ट्रॉबेरी शेती होताना पाहिली आहे. महाबळेश्वरच्याच धर्तीवर कोकणातील थंड हवा व ...

- शिवाजी गोरे 

दापोली- कोकणातील लाल मातीतसुद्धा उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हा प्रयोग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या शात्रज्ञानी यशस्वी केला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख असून, या थंड वातावरणात आपण आजपर्यंत शेकडो एकरची स्ट्रॉबेरी शेती होताना पाहिली आहे. महाबळेश्वरच्याच धर्तीवर कोकणातील थंड हवा व आल्हाददायक वातावरणात उत्कृष्ट स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, असा निष्कर्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शात्रज्ञांनी काढला आहे. त्यानंतर दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या वाकवली  येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. वाकवली येथील प्रक्षेत्रात कॅमारोजा, एस. ए., विंटर टोन या तीन जातींची लागवड करण्यात आली आहे. तुलनात्मकदृष्ट्या कोणत्या जातीचे कोकणात चांगले उत्पन्न येऊ शकते, यावरही अभ्यास सुरू आहे.

कोकणात केवळ भातपीक घेतले जाते; मात्र भातपीक घेऊन झाल्यावर शेती ओसाड पडलेली असते. या शेतीत दुबार पीक म्हणून स्ट्रॉबेरी शेती पर्याय ठरु शकते. कोकणातील स्ट्रॉबेरी पिकाला हेक्टरी १० ते १५ टन उत्पन्न मिळू शकते. यातून मिळणारे २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते, असा दावा कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाने केलेला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तरंच कृषी विद्यापीठाने केलेला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयत्न सत्यात उतरेल.

महाबळेश्वर येथून रोपे खरेदी करून नोव्हेंबर महिन्यात प्रायोगिक तत्वावर दहा गुंठे जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. यातून १ लाख ८०  हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ८० हजार खर्च वगळता १ लाख रुपये निव्वळ नफा या लागवडीतून मिळणार आहे. स्ट्रॉबेरीचे हेक्टरी १८ लाख रुपये उत्पन्न मिळते, त्यापैकी ८ लाख खर्च गेला, तरीसुद्धा १० लाखांचा नफा मिळू शकतो. केवळ ३ महिन्यात कोणत्याही पिकापासून शेतकऱ्याला १० लाख रुपये एवढा नफा मिळत नाही. मात्र, स्ट्रॉबेरी पीक नाजूक असल्याने थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. स्ट्रॉबेरी शेतीतून अल्प कालावधीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणार आहे. भातपिकानंतर रब्बी हंगामात स्ट्रॉबेरी शेती हा चांगला पर्याय ठरु शकतो. मात्र, स्ट्रॉबेरी हे नाजूक पीक असल्याने पिकाची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. या पिकाचा हंगाम कालावधी ४० दिवस असू शकतो. स्ट्रॉबेरी पीक ४० ते ५० दिवसात तोड योग्य होऊ शकते. परंतु, जानेवारीनंतर कोकणातील उष्णतेत वाढ होऊ लागते. त्यामुळे लवकर लागवड करून लवकर पीक कसे घेता येईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्ट्रॉबेरीची कोणती जात कोकणातील वातावरणात अधिक चांगली येऊ शकते, कोणत्या जातीपासून चांगले उत्पन्न मिळू शकते, याचा तुलनात्मक अभ्यास सध्या सुरु आहे.

अधिक पिके घेण्याचा प्रयत्नदापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, विस्तार शिक्षण संचालक, संशोधन संचालक यांचे मार्गदर्शनाखाली स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. वाकवली संशोधन केंद्र्रात विविध प्रकारची भाजीपाला पिके, कंदपिके, कलमे रोपे, नारळ, आंबा, काजू पिकातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावर्षीपेक्षा अधिक पिके पुढच्यावर्षी घेतली जातील.डॉ दिलीप महाले, विभागप्रमुख, वाकवली मध्यवर्ती संशोधन केंद्र, 

चांगली मागणीदापोली कोकण कृषी विद्यापीठाची स्ट्रॉबेरी बाजारामध्ये विक्रीला आली असून, दापोलीच्या स्ट्रॉबेरीला पर्यटक व स्थानिक ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेत या स्टॉबेरीला चांगली मागणी आहे.