शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

डोर्लेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

By शोभना कांबळे | Updated: March 6, 2024 23:33 IST

बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी  करता विहिरीमध्ये पाण्याच्या पाईपला पकडून बसल्याचे दिसून आले. 

रत्नागिरी : डोर्ले (ता. रत्नागिरी), ब्राम्हणवाडी  येथे बुधवार,दि.०६ रोजी विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात रत्नागिरी वन परीक्षेत्राला यश आले. बुधवारी सकाळी ७.३० वाजणेच्या सुमारास समीर नारायण तोडणकर यांच्या घराशेजारील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे सरपंच अजय तोडणकर, यांनी दुरध्वनीद्वारे वन विभागाला दिली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी  करता विहिरीमध्ये पाण्याच्या पाईपला पकडून बसल्याचे दिसून आले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  विहीर समीर नारायण तोडणकर यांच्या घराच्या शेजारी असून ती १५ फूट व्यास, कटडा नसलेली, ५० फूट खोल, बांधकाम नसलेली आहे.  विहीरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीमध्ये सोडल्यानंतर अर्ध्या तासामध्ये बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेण्यात आले. विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी  काळगे (झाडगाव, रत्नागिरी) यांनी पाहणी केली.  बिबट्या हा मादी प्रजातीचा असुन त्याचे वय साधारणपणे ३ ते ३.५ वर्षाचे असावे.तपासणी झाल्यानंतर बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याने वन विभागाच्या बचाव पथकाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

वन विभागाचे बचाव पथकामध्ये प्रकाश सुतार (वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी),  न्हानू गावडे (वनपाल पाली), प्रभू साबणे, (वनरक्षक रत्नागिरी), मिताली कुबल (वनरक्षक  जाकादेवी), व रेस्क्यू बचाव पथकामध्ये पोलीस पाटील, डोरले गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, प्राणीमित्र  कल्पेश डोंगरे, विष्णुदास गुरव, अनिकेत मोरे, दिनेश चाळके यांनी सहकार्य करत बिबट्याला स्थानिक व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.

बचाव पथकाला विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे, यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्री  क्रमांक.१९२६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी