शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:46 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देशिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरतीशिक्षक भरती प्रक्रियेसाठी तयारी सुरु

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे.मागील १० वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी पालकवर्गातून होत आहे.शिक्षक भरतीच न झाल्याने डी. एड. पदवीधारक सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.जिल्हा परिषदेच्या एकूण २६५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी ६८०० शिक्षक मंजूर आहेत. त्यापैकी शिक्षकांची ७०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाला शैक्षणिक घडी बसविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी अनेक शिक्षकांना रिक्त असलेल्या शाळांवर कामगिरीवर काढण्यात आले आहे.

निवडणुकीपूर्वी लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे शासनानेही जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये संधी मिळावी, यासाठी ही भरती उशिरा होत आहे.

नवीन निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांनाही या शिक्षक भरतीमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया करताना शिक्षण विभागाकडून इतर प्रवर्गासह त्यांच्यासाठी शिक्षक पदांमध्ये आरक्षण ठेवावे लागणार असून, त्यादृष्टीने काम सुरु आहे.प्रक्रियेची तयारी सुरुजिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेसाठी तयारी सुरु केली आहे. शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ यांच्यासह कर्मचारी ही भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी मेहनत घेत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी