शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पोलीस दलात १३० कर्मचाऱ्यांची भरती, १ जूनपासून नियुक्तीपत्रे देणार

By शोभना कांबळे | Updated: May 12, 2023 23:00 IST

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती

शोभना कांबळे, लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : रत्नागिरीतपोलिस शिपाई पदाच्या १३५ जागांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यातून १३० जणांची निवड झाली असून या नवीन पोलिस शिपायांना १ जूनपासून नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.रत्नागिरीत १३५ पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. यात यशस्वी झालेल्यांची आता वैद्यकीय चाचणीही घेण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेत १३१ जणांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी एक उमेदवार काही कारणास्तव अपात्र ठरला. उर्वरित निवड झालेल्या १३० जणांना आता नियुक्तीपत्रे येत्या १ जूनपासून देण्यात येणार आहेत. यात स्थानिक १९ उमेदवारांचा समावेश असल्याची माहितीही यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली.

ते म्हणाले, या भरतीत अधिकाधिक स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळावे, यासाठी इथल्या माहितीवर आधारित १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यातही इथले स्थानिक उमेदवार कमी पडले. त्यांची तयारी झालेली नसल्याने इथल्या भागावर आधारित प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत. त्याचप्रमाणे फिजिकलमध्येही ही मुले मागे पडली. गणिताची तयारीही झाली नसल्याने या मुलांना यातही गुण कमी पडले. त्यामुळे या भरतीत स्थानिक मुले कमी आली. स्थानिक मुलांना संधी मिळावी, म्हणून या भरती प्रक्रियेत इथल्या परिस्थितीवर आधारित, इथल्या नद्यांची, तसेच अन्य माहिती विचारण्यात आली होती. मात्र, तरीही इथली मुले कमी पडल्याची खंत यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.१३० नवीन पोलिस शिपाई यांची भरती होणार असल्याने आता जिल्हा पोलिस दलाच्या मनुष्यबळात अधिक वाढ होणार आहे. सध्या सुमारे १५०० पर्यंत पोलिस शिपाई आहेत. त्यात वाढ झाली असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. तसेच अजूनही काही रिक्त पदे आहेत, त्यासाठीही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अन्य रिक्त पदेही भरली जातील, असेही ते म्हणाले.

...................ताफ्यात ३४ वाहने

रत्नागिरी पोलिस विभागाला जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून १० बोलेरो गाड्या, २० मोटर सायकल मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे २५ सीटर ४ गाड्यांसाठीही ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे ही विविध प्रकारची ३४ वाहने जिल्हा पोलिस दलाला मिळाली असून लवकरच ही ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस