शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम खाते अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:37 IST

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या ...

ठळक मुद्देबांधकाम खाते अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला समस्यांचा पाढाधोकादायक रस्त्याला जबाबदार कोण?

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या रस्त्यातून पाण्यासाठी ३ मीटरची पाईपलाईन मध्यातून टाकल्याने हा रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न सोमवारी मिरजोळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेत विचारला. यावेळी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेही उपस्थित होत्या. बांधकाम खात्याच्या या रस्त्यावर उत्खनन करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा पाढा यावेळी ग्रामस्थांनी वाचला.मिरजोळे रस्त्याची दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यासाठी या ग्रामस्थांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी तसेच पाण्याच्या पाईपलाईनसाठी नगर परिषदेने केलेल्या खोदाईबाबत ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता नाईक यांची भेट घेत या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.मोबदला प्रकरणाची सर्व कागदपत्रे तपासण्याचे आदेश देत अधीक्षक अभियंता नाईक यांनी मंगळवारी रस्त्याची पाहणी करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी मिरजोळेचे सुरेंद्र पाटील, महेश पाटील, संजय नागवेकर, राहुल पवार, सुरज पाटील, हर्षराज पाटील तसेच समविचारी मंचचे संजय पुनसकर उपस्थित होते.नगर परिषदेला नोटीसया खराब रस्त्यामुळे जाणवणाऱ्या सर्व समस्या लक्षात घेत, अधीक्षक अभियंता नाईक यांनी मिरजोळे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नगर परिषदेला त्वरित नोटीस काढून ग्रामस्थांना धोकादायक ठरणार नाही, अशा पद्धतीने पाईपलाईनसाठी खोदकाम करावे, अशा सूचना छाया नाईक यांनी वाळके यांना दिल्या.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad transportरस्ते वाहतूकRatnagiriरत्नागिरी