शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रत्नकन्या श्रुतिकाची अन्न व कृषी संघटना नेटवर्क समन्वयकपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:53 IST

FishFood Ratnagiri News- युनायटेड नेशन्स स्थापित अन्न व कृषी संघटना (एफडीओ) या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेत आशिया आणि पॅसिफिकमधील कृषी सहकारी संस्थांच्या विकासासाठी नेटवर्क समन्वयक म्हणून रत्नकन्या श्रुतिका श्रीधर सावंत हिची निवड झाली आहे.

ठळक मुद्देअन्न व कृषी संघटना नेटवर्क समन्वयकपदी नियुक्तीदीड वर्षे माशांचे प्रकार व त्यांचे खाद्य या विषयावर संशोधन

रत्नागिरी : युनायटेड नेशन्स स्थापित अन्न व कृषी संघटना (एफडीओ) या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेत आशिया आणि पॅसिफिकमधील कृषी सहकारी संस्थांच्या विकासासाठी नेटवर्क समन्वयक म्हणून रत्नकन्या श्रुतिका श्रीधर सावंत हिची निवड झाली आहे.सेक्रेड हार्ट कान्व्हेंट स्कूल, उद्यमनगर येथे श्रुतिकाने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने शिरगाव मत्स्य महाविद्यालयात फिशरीज इंजिनिअर पदविका घेतली. फिशरीज ऑफ सायन्स विषयात पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अक्वॉकल्चर विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी थायलंड येथील वर्ल्ड रॅकिंग कॉलेज एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिने दीड वर्षे माशांचे प्रकार व त्यांचे खाद्य या विषयावर संशोधन केले.

माशांचे खाद्य तयार करण्यासाठी मासे न वापरता निसर्गातील कीडे व अन्य घटकांचा वापर केला जाऊ शकतो का? या खाद्यामुळे माशांच्या वाढीवर काय परिणाम होतो, त्यांचा दर्जा तपासला असता सकारात्मक परिणाम दिसून आले. तिच्या संशोधनाची दखल थायलंडमधील कंपन्यांनी घेतली.श्रुतिकाचे वडील एस. टी.च्या विभागीय कार्यशाळेत वरिष्ठ मेकॅनिकल, तर आई कृ. चि. आगाशे शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. श्रुतिकाचा लहान भाऊ मायक्रो बॉयोलॉजी विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अ‍ॅक्वॉकल्चर आणि अ‍ॅॅक्वाटिक रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत असताना श्रुतिकाने विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता.संशोधनाबरोबरच तिने प्रशिक्षण कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले होते. माशांसाठी अन्न तयार करण्यासाठी माशांऐवजी निसर्गातील घटकांचा वापर केला जातो व त्यामुळे माशांची वाढ चांगली होते, शिवाय दर्जाही चांगला राहतो, याबाबतचे तिने केलेले संशोधन व प्राप्त सकारात्मक परिणाम याची दखल घेण्यात आली. त्यामुळेच श्रुतिकाला जागतिक स्तरावर नेटवर्क समन्वयक म्हणून काम करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे.अनेक संशोधन प्रकल्पथायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अ‍ॅक्वॉकल्चर आणि अ‍ॅॅक्वाटिक रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत असताना श्रुतिकाने विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता. संशोधनाबरोबरच तिने प्रशिक्षण कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले होते. 

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग