शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:29 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील १० शिक्षकांची नांवे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली़ यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील संतोष काशिराम चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विशेष पुरस्कार बहाल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देसंतोष काशिराम चव्हाण यांना विशेष पुरस्कार १३ सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील १० शिक्षकांची नांवे अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली़ यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील संतोष काशिराम चव्हाण या पदवीधर शिक्षकांना विशेष पुरस्कार बहाल करण्यात आला आहे़.यावेळी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे उपस्थित होते़. दि़ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो़.

दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात़.

यंदाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील २४ शिक्षकांना प्रस्ताव सादर केले होते़ त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातून केवळ एका शिक्षकाचा समावेश होता़ या शिक्षकांच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मुलाखती घेतल्या होत्या़.प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांमध्ये सर्वोत्कृष्ठ काम केलेल्या १० शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली़. त्यानंतर ती यादी कोकण आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती़.आयुक्तांच्या मंजुरीनंतर बुधवारी अध्यक्षा साळवी यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर केली़. यामध्ये मंडणगड - अमरदीप बळीराम यादव, दापोली - दीपिका दिपक मर्चंडे, खेड - अनंत सीताराम मोहिते, चिपळूण- दीपक नंदकुमार मोने, गुहागर- सुरेंद्र सदानंद चिवेलकर, संगमेश्वर- रसिका रविकांत शिंदे, रत्नागिरी- प्रकाश रघुनाथ पवार, लांजा- नरेंद्र गंगाराम पवार, राजापूर- संदीप बाळकृष्ण परटवलकर यांचा समावेश आहे.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रोख रक्कम ५०० रुपये, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे़. हा पुरस्कार वितरण सोहळा दि़ १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे़.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी