शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : यावर्षी हापूसचा हंगाम लांबणार, मोहोराचे प्रमाण अत्यल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:00 IST

दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.

ठळक मुद्देयावर्षी हापूसचा हंगाम लांबणारमोहोराचे प्रमाण अत्यल्प

रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.वास्तविक आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीस सुरूवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे.

यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाला मात्र श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला पाऊस नवरात्रातच लागला. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण अधिक आहे. किनारपट्टीलगत बागायतीमध्ये मोहोराला प्रारंभ झाला असला तरी प्रमाण अत्यल्प आहे.वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियस पर्यत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. गेले दोन ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर्तीपासून थंडी सुरू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तद्नंतर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिलपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येवून फळधारणेचे प्रमाण कमी होते. सुरूवातीला पिक कमी होते मात्र मे मध्ये एकाचवेळी आंबा बाजारात आल्याने दर कोसळले होते.यावर्षी पावसाचे सरासरीपेक्षा प्रमाण कमी राहिले असतानाही झाडांना पालवीचे प्रमाण अधिक आहे. हवामानावर आधारित आंबा, काजू पिकासाठी फळपिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चत्तम तापमान यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबा पिक विमा योजना सुरू केली. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू आहे. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यामध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अदयापही त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिले असून मोठ्या प्रमाणावरील पालवीमुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापर देखील फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून पालवीवर तुडतुडा प्रतिबंधात्मक किटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या फळपिक विमा योजनेचा परतावा अद्याप शेतकऱ्यांना प्राप्त झालेला नाही. गतवर्षी आॅगस्टमध्ये परतावा जाहीर करीत परतावा रक्कम वितरण सुरू झाले होते. त्यामुळे परताव्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.- एम.एम गुरव,शेतकरी

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी