शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी  : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:46 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप सुरुअवजड सामुग्रीची वाहतूक, मातीमुळे अपघातांचा धोका

पाली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.

मुदत संपून दहा दिवस उलटले तरी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत कामे अत्यंत जोरात सुरु असल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या सुरू असलेल्या कामांमुळे सध्या पाऊस असल्याने महामार्गावर मातीचा चिखल, अवजड सामुग्री पोकलेनसारखी सध्याच्या वापरातील वाहने डांबरी रस्त्यावरुन नेली जात असल्याने अपघातांचा धोका वाढलेला आहे.महामार्ग चौपदरीकरणातील आरवली ते वाकेड या विभागाचे कंत्राट एमईपी या कंपनीला देण्यात आलेले असून, या विभागातील काम कंपनीने सर्वांत उशिराने सुरु केलेले आहे. हे काम निर्धारित वेळेत सुरू केले असते तर आज ही वेळ आली नसती.

सध्या पालीनजीक जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर या भागामध्ये दिवस-रात्र पावसामध्ये अत्यंत वेगाने तीन पोकलेन मशिनने काम जोरात सुरु आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षिततेकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी महामार्गावर मातीचा चिखल येऊन रस्त्यावरुन वाहने घसरुन अपघाताचा धोका आहे. शिवाय रस्त्यावरुन पोकलेन सारखी अवजड मशिनरी चालवत नेल्याने रस्त्याला खड्डे पडत आहेत. यामुळे सध्या वापरातील डांबरी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.चौपदरीकरणातील कामे पाली बाजारपेठ, देवतळे माळ, मराठेवाडी, या मानवी वस्तीनजीक सुरू आहेत. मशिनने रात्रभर कामे सुरु असल्याने त्याच्या आवाजाचा अनेक लोकांवर परिणाम होत आहे.

शिवाय कापडगाव ते मठपर्यंत रस्त्याच्या बाजू पट्ट्यांवर तोडलेल्या झाडांचे तुकडे तसेच असल्याचे बाजू पट्ट्याच राहिलेल्या नाहीत. बाजूपट्टी नाही. त्यामुळे पादचारी महामार्गावरुनच जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत आहेत. ही बाब त्यांच्यासाठी धोकादायक आहे. महामार्गावर सुरक्षा उपाययोजनांकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थ करत आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी