शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत भाजी विक्रेते-नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:34 IST

रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविके्रत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते धावल्याने कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देस्वाभिमानचे कार्यकर्ते मदतीला धावलेवाहनांसह सर्वजण पोलीस स्थानकात

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविक्रेत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते धावल्याने कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार केली होती.

जोपर्यंत सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मूळ जागेवरच या भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत स्वाभिमान पक्षाने या भाजी विक्रेत्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर नगरपरिषदेने शहरातील फिरते विके्रते, स्टॉल्स, भाजी व फळ विके्रत्यांविरोधात मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनंतर मारूती मंदिर येथील भाजी विक्रेते क्रीडांगणाच्या मागील बाजूला स्थलांतरीत झाले होते.मात्र, बुधवारी सकाळी भाजी विके्रत्या महिला पुन्हा क्रीडांगणाच्या पुढील बाजूला भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी त्याठिकाणी आपल्या पथकासह दाखल झाले. त्यांनी भाजीविक्रेत्या महिलांचे सामान उचलण्यास सुरूवात केली. या कारवाईला भाजीविक्रेत्या महिलांनी विरोध करण्यास सुरूवात केली. या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला.भाजीविक्रेत्या महिलांविरोधात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याची माहिती स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना मिळताच सर्वजण त्याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे कर्मचारी आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली. स्वाभिमानचे कार्यकर्त्यांनी आधी शहरातील इतर विके्रत्यांवर कारवाई करा मगच भाजीविक्रेत्या महिलांना हटवा अशी मागणी करत शहरातील विक्रेते बसलेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन गेले. त्यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते.

अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत वाहनांसह पोलीस स्थानकात आणले. याबाबत परस्पर विरोधी तक्रार देण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :MarketबाजारRatnagiriरत्नागिरी