शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

रत्नागिरी : लांजात चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक, दोन साथीदार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:11 IST

ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत भांबेड व प्रभानवल्ली येथील बँक, दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी नाकाबंदी केली असता अटक करण्यात आली आहे तर दोन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

ठळक मुद्देलांजात चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटकचोरीमध्ये आणखीन दोन साथीदार

लांजा : ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत भांबेड व प्रभानवल्ली येथील बँक, दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी नाकाबंदी केली असता अटक करण्यात आली आहे तर दोन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.बुधवारी दि. ७ नोव्हेंबर रोजीच्या एका रात्रीत भांबेड येथे असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भांबेड या बँकेत चोरीच्या उद्देशाने दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून बँकेत प्रवेश करण्यात अज्ञात चोरटे यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी लॉकर रुमकडे आपला मोर्चा वळवला. लॉकर रुमचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता रात्री १.४५ वाजता मोठमोठ्याने सायरन वाजू लागल्याने धोका ओळखून अज्ञात चोरट्यांनी येथून पलायन केले.बँकेत चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी बाजारपेठ असलेल्या सारीम इक्बाल वाघू यांच्या वेल्डिंग दुकानाचे शटर तोडून गॅस कटर मशीन चोरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या दुकानात सिलेंडर नसल्याने ते हे गॅस कटर मशीन घेऊन गेले नाहीत. बँकनंतर वेल्डिंग दुकान फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेल्या चोरट्यांनी आपला मोर्चा प्रभानवल्ली येथे वळवून शशिकांत बाबल्या चव्हाण यांचे दुकान फोडले.

या दुकानातील तीन हजाराची चिल्लर घेऊन जाण्यात ते यशस्वी झाले होते. परतीच्या प्रवासाला निघता निघता उमेश तुकाराम बेर्डे यांच्या दुचाकीमधील पेट्रोल चोरुन परार झाले होते. या अज्ञात चोरट्यांच्या मागावर लांजा पोलीस होतेच. लांजा येथे चोरीचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यामुळे या चार चोरट्यांनी आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळवला होता.शनिवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी रात्री नाकाबंदी केली असता शरद सर्जेराव काळे (२८, करविर), विशाल भिमराव कांबळे (२८, पासार्डे, करवीर) या दोघांना संशयित म्हणून अटक करून त्यांची चौकशी केली असता लांजा भांबेड येथे चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीमध्ये आणखीन दोन साथीदार होते.

सचिन महादेव चौगुले (२९, पासार्डे-करवीर), बाबूराव मारुती पाटील (३१, राधानगरी) या चौघांनी भांबेड, प्रभानवल्ली येथे चोरीचा प्रयत्न केला आहे. सध्या हे चोरटे वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच हे अट्टल चोरटे लांजा पोलिस आपल्या ताब्यात घेणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी