शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

रत्नागिरी : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दारूने भरलेल्या दोन मारूती व्हॅन जप्त, राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:54 IST

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात केली आहेत. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळूण) आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) याठिकाणी विभागाने केलेल्या तीन कारवाईत दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण ७ लाख ३१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाची कारवाईव्हॅनसह एकूण ७ लाख ३१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत फरशी तिठा आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) यासह तीन ठिकाणी कारवाई

रत्नागिरी : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात केली आहेत. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळूण) आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) याठिकाणी विभागाने केलेल्या तीन कारवाईत दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण ७ लाख ३१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.चिपळूण तालुक्यातील फरशी तिठा येथे काल (गुरूवारी) रात्री केलेल्या कारवाईत संशयित आरोपी राजेश प्रभाकर हरचिलकर याच्या गाडीतून गोल्डन एस फाईन व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या १२ सीलबंद बाटल्या भरलेले बॉक्स असे एकूण ५० बॉक्समधील ६०० प्लास्टिक बॉटल असा एकूण ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यानंतर त्याचठिकाणी केलेल्या दुसºया कारवाईत ओमनी चालक दीपक महादेव उत्तेकर (४०, कुरवळ-जावळी, ता. खेड) याच्याकडून १७ हजार ५०० रूपये किंमतीची ३५० मिली क्षमतेची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत वाहनासह १ लाख ९५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.कोंडमळा- सावर्डे येथे आज सकाळी ९.१० ते १०.१० यावेळेत सुनील सुभाष सावर्डेकर (३०, रा. निवाचीवाडी, चिपळूण) याच्या घराशेजारी गोवा मद्याची व गावठी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने बसलेला होता. त्याला रंगेहात पकडून त्याच्या ताब्यातून २६ हजार ४०० रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २० लिटर मापाचे गावठी हातभट्टी दारूने भरलेले २ प्लास्टिक कॅन तसेच गोल्डन एस ७५० मिली क्षमतेच्या ४० बॉटल जप्त करण्यात आले आहेत.या कारवाईत तीन संशयित आरोपींकडून ३९० लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच ४८० मिली गोवा बनावटीचे विदेशी मद्द तसेच दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण रूपये ७ लाख ३१ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकामध्ये प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, खेडचे प्रभारी निरीक्षक महेश शेंडे, चिपळूणचे प्रभारी निरीक्षक मेहबूब शेख, दुय्यम निरीक्षक विनोद इंजे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, राजेंद्र भालेकर, जवान महादेव चौरे, अर्वद शेख, अतुल वसावे, निनाद सुर्वे, सावळाराम वड, संदीप विटेकर यांचा सहभाग होता.

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीRatnagiriरत्नागिरी