शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रत्नागिरी : टोल एकांकिकेने पटकावला शामराव करंडक, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:39 IST

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता पारितोषिक वितरणाने झाली. तीन दिवसांच्या या कला, क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी मिळाली. छंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शामराव करंडक एकांकिका स्पर्धेतील उर्वरीत एकांकिकांचे सादरीकरण झाले तसेच समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या.

ठळक मुद्देचौकट क्रिएशन ग्रुपच्या टोल एकांकिकेने पटकावला शामराव करंडकघंटानाद सन्मान स्मितल मिलिंंद चव्हाण हिला प्रदान विविध गुणवंतांच्या बक्षीस वितरणाने छंदोत्सवाची सांगता

रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता पारितोषिक वितरणाने झाली. तीन दिवसांच्या या कला, क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी मिळाली. छंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शामराव करंडक एकांकिका स्पर्धेतील उर्वरीत एकांकिकांचे सादरीकरण झाले तसेच समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या. यावर्षी चौकट क्रिएशन ग्रुपच्या टोल या एकांकिकेने शामराव करंडक पटकावला.तिसऱ्या दिवसाचा घंटानाद सन्मान अभिनय क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या स्मितल मिलिंंद चव्हाण हिला प्रदान करण्यात आला. तसेच पूर्वा किनरे, सृष्टी जाधव, अपूर्वा नाचणकर, प्रियांका चव्हाण या विद्यार्थिनींना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील विविघ क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

एन. सी. सी. कॅडेट सिध्देश सुनील शिंंदे याला उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. छंदोत्सवाची सांगता विविध गुणवंतांच्या बक्षीस वितरणाने झाली.यावेळी साक्षी कोतवडेकर आणि ऋग्वेद जाधव यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मानाचा समजला जाणारा मंगलमूर्ती पुरस्कार सिद्धी भवरसिंंग दसाणा हिला प्रदान करण्यात आला.

आदर्श विद्यार्थी म्हणून ओंकार अंकुश वाळुंज आणि आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्राजक्ता श्रीरंग वैद्य यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून मृदुला देवस्थळी हिला गौरविण्यात आले. या महोत्सवालामुळे महाविद्यालयातील तरूणाईमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत होते.शामराव करंडक एकांकिका स्पर्धा

प्रकाश योजना : प्रथम - सौरभ आपटे (एक अपूर्व शोध) द्वितीय गिरीश मधुकर चव्हाण (भिंंत) तृतीय तन्वी संतोष साळवी (टोल)

सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंगे - टोल (एकांकिका) चौकट क्रिएशन्स, सर्वोकृष्ट,

नेपथ्य : प्रथम मिथील रवींद्र केदार, द्वितीय शुभम उमेश आंब्रे (भिंंत), तृतीय अथर्व अतुल देशपांडे (रात्र बनोळखी),

सर्वोत्कृष्ट लेखन - प्रथम ऋषिकेश अनंत फणसोपकर (टोल), द्वितीय साक्षी योगेश पंडित (नाव विकत घेवाक), तृतीय अथर्व विवेक भिडे (रात्र अनोळखी),

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम संतोष तेजस साळवी (टोल), द्वितीय शुभव अशोक गोविलकर (भिंंत), तृतीय सुकन्या अरविंंद ओळकर,

सर्वोत्कृष्ट संगीत : प्रथम रवी शिवानी राठोड (नाव विकत घेवाक), द्वितीय प्रवीण सुरेश कोलापटे (टोल), तृतीय ऐश्वर्या दिलीप जागुष्टे,

उकृष्ट अभिनेता - प्रथम शुभम अशोक गाविलकर (भिंत), द्वितीय मिथील रवींद्र केदार (टोल), तृतीय प्रवीण प्रकाश माहिते (नाव विकत घेवाक)

उत्कृष्ट अभिनेत्री - प्रथम प्रियांका राजाराम पावसकर, द्वितीय सुकन्या अरविंंद ओळकर, तृतीय जान्हवी जितेंद्र आगरे,

उत्कृष्ट एकांकिका - प्रथम टोल (चौकट क्रिएशन), द्वितीय भिंंत (रत्नभूमी क्रिएशन), तृतीय नाव विकत घेवाक (एन. एस. एस. वक्रतुंड) 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीentertainmentकरमणूक