शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रत्नागिरी :आजचे स्वराज्य सुराज्य होणे गरजेचे : रवींद्र वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:25 IST

आजच स्वराज्य हे प्रामुख्याने सुराज्य होणे, ही काळाची गरज आहे. सुराज्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना स्वातंत्र्य, सुख मिळवून देणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने देशाने पंचवार्षिक योजना सुरू केल्या आहेत, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआजचे स्वराज्य सुराज्य होणे गरजेचे : रवींद्र वायकररत्नागिरीत पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजारोहण

रत्नागिरी : आजच स्वराज्य हे प्रामुख्याने सुराज्य होणे, ही काळाची गरज आहे. सुराज्य हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना स्वातंत्र्य, सुख मिळवून देणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने देशाने पंचवार्षिक योजना सुरू केल्या आहेत, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले.भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदान येथे राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पथसंचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पोलीस, होमगार्ड, स्काऊट, एन. सी. सी., श्वान पथक, आदी पथकांनी संचलनात सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्त्व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण इंगळे यांनी केले.वायकर पुढे म्हणाले की, पंचवार्षिक योजनेतून देशात रेल्वेचे जाळे विणले, खेड्यपाड्यांचा विकास केला, शिक्षणामध्ये प्रगती केली, महिलांचे सबलीकरण केले, उत्तम न्याय व्यवस्था दिली, निरक्षरता दूर करण्याचा प्रयत्न केला, दळणवळणाच्या सोयी केल्या.

देश घडवायचा असेल तर तळागाळापर्यंत पायाभूत सुविधा पोहोचविणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीत अनेक सेवा, सुविधा राज्याच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या प्रणय राहुल तांबे यांना जीवनरक्षा पदक पुरस्कार २०१७ने पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचाही पोलीस महांसचालक पदक मिळल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या उत्कृष्ट लघु उद्योजक, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रत्नागिरी यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी