शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:39 IST

फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.

ठळक मुद्देउष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घामअतितीव्र उष्म्याने रत्नागिरीकर हैराणमे महिन्यात तीव्र उन्हाळा?

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. रत्नागिरीचा पारा मंगळवारी तब्बल ३८ अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.सायंकाळ झाल्यानंतर उष्मा काहीसा कमी होत असला तरी दिवसभर तापमान जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. मार्चची तीव्रता अजूनही यायची आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरु असतानाच रत्नागिरीकरांच्या डोक्यावर ३८ अंश सेल्सिअस एवढी उष्णता आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारएवढ्या घामाच्या धारा लागत आहे.प्रतिवर्षी वाढत जाणारी उष्मा चिंतेचा कारण ठरत असताना यंदा आतापासूनच उष्म्याने कहर केल्याने येणारा मे महिना हा कडक उन्हाळ्याचाच असेल, अशी चर्चा आहे. सोमवारी रत्नागिरीचे तापमान हे कमाल ३७ तर किमान २८ अंश सेल्सिअस एवढे होते.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे तापमान कमाल ३१ तर किमान २४ अंश सेल्सिअस एवढे होते. गेल्या २० दिवसात अचानक तापमानात झालेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ही तापमावाढ सुरु झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसात तापमानाची वाढ दिसून येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरीचे फेब्रुवारीत सर्वसाधारण कमाल तापमान हे ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असते. मात्र आता ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर सर्वसाधारण किमान तापमान हे २० अंश सेल्सिअस असते. ते २६ फेब्रुवारीला तेच कायम होते.महावितरणचा दिलासातापमान वाढल्याने साहजिकच वीजेचा वापरही वाढला आहे. मात्र महावितरणने अखंड वीजपुरवठा करून ग्राहकांना उष्म्यात दिलासा दिला आहे.मार्चमध्ये दिलासा ?हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमानात झालेली ही वाढ फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. मात्र १ मार्चपासून त्यामध्ये थोडाफार दिलासा मिळू शकतो. १ मार्च ते ४ मार्च दरम्यान हे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी