शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रत्नागिरी : इनामपांगारीची सुवर्णकन्या सोनाली गावडेचे गरिबीमुळे स्वप्न अधुरे; उमेद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:42 PM

इनामपांगारी या छोट्या गावात जन्माला आलेल्या सोनाली गावडे ही सुवर्णकन्या शालेय जीवनापासूनच धावणे या क्रीडा प्रकारात पारंगत होती. पायका क्रीडा स्पर्धेअंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची कमाई करत तिने चेन्नई येथील नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

ठळक मुद्देसोनाली गावडेची गरिबीमुळे स्वप्न अधुरेइनामपांगारीची सुवर्णकन्या ; उमेद कायम

शिवाजी गोरेदापोली : इनामपांगारी या छोट्या गावात जन्माला आलेल्या सोनाली गावडे ही सुवर्णकन्या शालेय जीवनापासूनच धावणे या क्रीडा प्रकारात पारंगत होती. पायका क्रीडा स्पर्धेअंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची कमाई करत तिने चेन्नई येथील नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

ग्रामीण भागातून सुवर्णपदक मिळवणारी पहिली मुलगी बनण्याचा मान तिला मिळाला होता. देशाची मान अभिमानाने उंचावण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे क्षमता असतानाही केवळ आर्थिक पाठबळ नसल्याने देशासाठी आपण खेळू शकत नसल्याची खंत तिच्या मनात आहे.कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. अशातच तिच्या जन्माअगोदरच वडिलांचे छत्र हरपले. वडिलांनंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आई सुवर्णा गावडे यांच्यावर आली.मोलमजुरी करून आईने चारही मुलांचे संगोपन केले. वडिलांची उणीव भासू दिली नाही. सगळ्यात छोटी मुलगी सुवर्णा गावडे हिने आईच्या कष्टाचे सोने केले.

चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्यानंतर यापुढे आपण देशासाठी खेळावे, अशी तिची इच्छा होती. परंतु कुटुंबाची गरिबी व आईची मेहनत तिला पाहावत नव्हती. म्हणून तिने खेळाचा डाव अर्ध्यावर सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आज ती मंडणगड पोलीस स्थानकात कार्यरत आहे. 

पुन्हा खेळाकडे लक्ष द्यायचे आहे.देशासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवायचे होते. परंतु वडिलांच्या निधनानंतर आईने खूप कष्ट केले. इनामपांगारी मराठी शाळेचे तत्कालीन मुख्यध्यापक खांडेकर गुरुजी व वि. रा. घोले हायस्कूलचे क्रीडाशिक्षक अनिल कुंभार यांनी उत्तम मार्गदर्शन केले आणि आर्थिक मदतही केली. त्यामुळेच मी नॅशनलपर्यंत पोहोचू शकले. पुन्हा खेळाकडे लक्ष द्यायचे असून, अजून उमेद कायम आहे.- सोनाली गावडे 

तिला पुढे खूप धावायचे होतेपतीचे अपघाती निधन झाले तेव्हा माझ्या पायाखालची वाळूच सरकली. तीन लहान मुलं, सोनाली ७ महिन्यांची पोटात होती. मुलांना खूप शिकवून मोठं करण्याचं पतीचं स्वप्न होत. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची व मुलांचं संगोपन करण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर होती. शिक्षकांनी केलेली मदत व कष्ठाने सोनालीने अनेक स्पर्धा जिंकल्या. तिला पुढे खूप धावायचे होते. मात्र, कुटुंबाच्या गरिबीमुळे तिला खेळ अर्धवट सोडावा लागला याचे दु:ख आहे.- सुवर्णा गावड

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला