शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महायुतीच्या जागेचा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बाेर्डाच्या बैठकीत होईल : रवींद्र चव्हाण

By अरुण आडिवरेकर | Updated: April 14, 2024 23:37 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. याबाबत दिल्लीत पार्लमेंटरी बाेर्डाची बैठक सुरू असून, त्या बैठकीत याेग्य ताे निर्णय हाेईल. या मतदारसंघात मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे महायुती म्हणून काम करतील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत आज सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यालयाचे रत्नागिरीत रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या उद्घाटन साेहळ्याला महायुतीचे आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते. मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टीने जे करावे लागेल ते सर्व याेजनाबद्ध करण्याबाबत या कार्यालयातून काम हाेईल, असे त्यांनी सांगितले.

महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण आहे तर काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी कमळ अशी निशाणी आहे. त्यामुळे महायुतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांना चिन्ह अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही वरिष्ठ मंडळी महायुतीला याेग्य ताे निर्णय घेतील, आम्हाला आवश्यक असणारे निर्णय ते नक्की घेतील. हा निर्णय लवकरच हाेणे अपेक्षित आहे. या उमेदवारीबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही उत्कंठा लागलेली आहे. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचेही मंत्री चव्हाण म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गात महायुतीचे मेळावे झाले त्याला महायुतीचे घटक पक्ष हाेते. रत्नागिरीतही कार्यकर्ते आणि त्यांच्यासाेबत असणाऱ्या सर्वांच्या शुभेच्छा महायुतीच्या पाठीशी आहेत. रत्नागिरीतील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मंत्री उदय सामंत, किरण सामंत हे सर्वजण महायुतीचे काम करत आहेत. उदय सामंत यांच्याकडे पक्षाची माेठी जबाबदारी आहे. पक्षाकडून ज्याठिकाणी त्यांचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, त्याठिकाणी समन्वय राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना वेळ देण्यास मिळत नाही. मात्र, याठिकाणची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात असल्याने १५ तारखेनंतर त्यांनी याठिकाणी एकत्रित मेळावे घेतले जातील असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग