शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या महत्त्वांकाक्षी कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता आणि सुशोभिकरणाची मोहीम राबवून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. स्वच्छता कार्यक्रमाची सुरूवात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वच्छता व सुशोभिकरणाने करण्यात येणार आहे. या पंधरवड्याअखेर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत व्यक्त केला.‘स्वच्छ भारत अभियाना’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. बोबडे आदींसह रेल्वे, एस. टी., नगरपालिका आदी विभागांचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही आता नित्य आणि निरंतर चालणारी लोकचळवळ बनली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था - संघटना आणि लोकांच्या सक्रीय सहभागातून हे अभियान निश्चितच यशस्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. मुळातच स्वच्छतेची मूल्ये जपणारा रत्नागिरी जिल्हा या अभियानातही आघाडीवर राहावा, यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानात स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. ५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता पंधरवड्यात पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाचा यात सहभाग अपेक्षित आहे. अस्वच्छता करणाऱ्याविरूद्ध प्रसंगी फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागी होणार असून, संपूर्ण राजापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या प्रतिष्ठानचे कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन इतरही संस्था पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी के. लक्ष्मी मंजू, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, सार्वजनिक बांधकामचे एस. आर. बोबडे आदींसह अन्य उपस्थित होते.