शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  आडिवरे गावचे सुपुत्र श्रीधर पाध्येंचा ८१व्या वर्षीदेखील तबला वादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 15:36 IST

राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र तसेच दिल्ली व अजराडा घराण्याचे अभ्यासक, तबलावादक, तालमहर्षी गुरुवर्य पंडित श्रीधर यशवंत पाध्ये वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त शुक्रवारी (दिनांक ९ मार्च) महाकाली मंदिर, आडिवरे येथे त्यांच्या शिष्यांतर्फे पंडितजींचा सत्कार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआडिवरे गावचे सुपुत्र श्रीधर पाध्येंचा ८१व्या वर्षीदेखील तबला वादन- शिष्यवृंदांचे तबला वादन, पंडित राजेंद्र मणेरीकर यांचे शास्त्रीय गायन- आडिवरे येथे तालमहर्षींचा हृदयसत्कार

रत्नागिरी : राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र तसेच दिल्ली व अजराडा घराण्याचे अभ्यासक, तबलावादक, तालमहर्षी गुरुवर्य पंडित श्रीधर यशवंत पाध्ये वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त शुक्रवारी (दिनांक ९ मार्च) महाकाली मंदिर, आडिवरे येथे त्यांच्या शिष्यांतर्फे पंडितजींचा सत्कार करण्यात येणार आहे. आज वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करतानाही पंडित श्रीधर पाध्ये यांचा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरु आहे.हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून, यावेळी पं. पाध्ये यांचे निवडक शिष्य तबलावादन करणार आहेत. यावेळी पंडित राजेंद्र मणेरीकर यांचे शास्त्रीय गायनदेखील होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.राजापूर तालुक्यातील आडिवरे गावात दिनांक ९ मार्च १९३८ रोजी जन्मलेल्या श्रीधर पाध्ये यांचे आरंभीचे तबल्याचे शिक्षण कै. पं. सखारामपंत भागवत, कशेळी यांचेकडे झाले. कोकणातील पारंपरिक भजनांमधून त्यांच्यावर ताल व लयींचे सूक्ष्म संस्कार झाले. मुंबईला आल्यावर सन १९५७ साली त्यांची पं. यशवंतराव केरकर यांच्याशी भेट झाली व त्यांच्या सांगितिक जीवनाला नवी दिशा प्राप्त झाली.

पं. केरकर हे दिल्ली-अजराडा व पूरब घराण्याच्या ज्ञानाचे महासागर होते. उस्ताद गामे खाँ, उस्ताद हबीबुद्दीन खाँ व उस्ताद आमिर हुसेन खाँ यांच्यासह अनेक गुरुंकडून त्यांनी विधीवत विद्या प्राप्त केली होती. उस्ताद थिरकवा साहेबांचाही सहवास त्यांना लाभला. पं. केरकर यांच्याकडून श्रीधर पाध्ये यांना घराणेदार बंदिशींचा खजिना व निकासाचे मार्गदर्शन मिळाले. आडिवरे येथे या कार्यक्रमाच्यानिमित्ताने त्यांना पाहण्याची संधी येथील ग्रामस्थांना मिळणार आहे.अखंड गुरूसेवासन १९५७पासून १९९२पर्यंत म्हणजेच पं. केरकर यांच्या अखेरपर्यंत पाध्ये यांनी पं. केरकर यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेताना अखंड गुरुसेवा केली. सन १९६५ साली पं. श्रीधर पाध्ये यांनी तबला शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात दहा वर्षे अध्यापनाचे कार्य केले.अग्रक्रमाने नावआज देशात हयात असलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तबला गुरुंमध्ये दिल्ली आणि अजराडा घराण्याचे तबलावादक गुरुवर्य पंडित श्रीधर पाध्ये अर्थात पाध्ये मास्तर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर यांनाही साथबालगंधर्व व पंडिता हिराबाई बडोदेकर यांचेसोबतही प्रत्येकी एकदा साथ केली. ज्येष्ठ संगीततज्ञ प्रा. बी. आर. देवधर यांच्या संगितावरील व्याख्यानांमध्ये तसेच मैफलींमध्ये पाध्ये यांनी तबला संगत केली. पंडिता धोंडुताई कुलकर्णी यांचेसोबत सतत ४० - ५० वर्षे साथसंगत केली.नाट्यसंगीताचेही तंत्र अवगतशास्त्रीय संगीतासोबतच पाध्ये यांना नाट्यसंगीत वाजविण्याचे देखील तंत्र अवगत आहे. शांता आपटे यांच्या एकपात्री ह्यस्वयंवरह्ण नाटकाला त्यांनी संगत केली. अनेक वर्षे त्यांनी सुहासिनी मूळगांवकर यांच्या नाटकांच्या प्रयोगात तबल्याची संगत केली. महत्त्वाचे म्हणजे श्रीधर पाध्ये यांना भजन, चक्रीभजन, साखी, दिंडी व कीर्तन या पारंपरिक लोकसंगीत प्रकारांमध्ये देखील समर्पक तबलासाथ करण्याचे तंत्र अवगत आहे.जोहान्सबर्गमध्येदेखील प्रात्यक्षिक वर्गसन १९९३ साली पं. श्रीधर पाध्ये दक्षिण आफ्रिकेतील दर्बन विद्यापीठाच्या निमंत्रणावरुन तेथील संगीत विभागात अतिथी प्राध्यापक म्हणून गेले होते. त्यावेळी जोहान्सबर्ग येथील लेनेशिया स्कूल फॉर म्युझिक येथे देखील त्यांनी चार महिने तबल्याचे प्रात्यक्षिक वर्ग घेतले. त्यापूर्वी द. आफ्रिकेतील १०-१५ विद्यार्थी मुंबईत १-२ वर्षे राहून त्यांचेकडून तबला शिक्षण घेऊन गेले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक