शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रत्नागिरीत शिवसेना उपशहरप्रमुखाचे केशकर्तनालय फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:07 IST

राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे केशकर्तनालयाची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

ठळक मुद्देरत्नागिरीत शिवसेना उपशहरप्रमुखाचे केशकर्तनालय फोडले राजकीय वैमनस्यातून वाद, शिवसेना आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी

रत्नागिरी : राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे केशकर्तनालयाची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत आमदार राजन साळवीदेखील होते. या तोडफोडीनंतर रात्री रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सोमवारी माळनाका परिसरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका टीव्ही चॅनलने लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शिवसेना आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांमध्ये खटका उडाला होता. शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत पालकमंत्री असतानाचा जुना व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविल्याने शिवसैनिकांनी आक्षेप घेत हंगामा केला, त्यांनतर चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ दाखविणाऱ्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर वादावर पडदा टाकण्यात आला.पक्षाच्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण आणि मारहाणीचा व्हायरल झालेला व्हिडीओ यामुळे स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला होता. त्यातूनच मंगळवारी सायंकाळी वादाची ठिणगी पडली आणि दुकानाची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास इनोव्हासह काही दुचाकीवरून आलेल्या अनोळखी हल्लेखोरांनी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांच्या दुकानाची तोडफोड करून दुकानात घुसून चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उद्योजक किरण सामंत यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. दोन पक्षात उफाळलेला वाद अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत पोलीस बंदोबस्त वाढविला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाRatnagiriरत्नागिरी