शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शिवसेनाच अव्वलस्थानी; राष्ट्रवादीची पीछेहाट, भाजपची ताकद आणि लोकप्रतिनिधी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:48 IST

देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.

ठळक मुद्देगुहागरमध्ये राष्ट्रवादी बॅकफूटवर, शिवसेनेच्या जिल्हा-राज्य नेत्यांचे शहरांवर विशेष लक्षजिल्हाध्यक्ष नसलेली काँग्रेस अजूनही मागेच, विधानसभेसाठी राजकीय पक्ष सरसावले

रत्नागिरी : देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.लोकसभा निवडणुकीपासूनचा विचार केला, तर जिल्ह्यात एकूण मतांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा शिवसेनेला मिळाला. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही हाच निकाल कायम होता. दीड वर्षापूर्वी झालेल्या पाच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येही पन्नास टक्के जागा शिवसेनेने मिळवल्या होत्या. आताच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नावावर कमी संख्या दिसत असली तरी गुहागरमधील शहर विकास आघाडीला सेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे सेनेचे पारडे जड आहे.राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मोठी घसरण झाली आहे. गुहागरमधील पीछेहाट हा राष्ट्रवादीसाठी मोठाच धक्का आहे. त्या तुलनेत भाजपने अनपेक्षित यश मिळवले आहे. चिपळूणनंतर आता देवरूखचे नगराध्यक्षपदही भाजपकडे आले आहे. अर्थात चिपळुणात भाजपकडे नगरसेवकांचे बळ कमी होते.

देवरूखात सर्वांत जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. गुहागरमध्ये भाजपला मिळालेल्या ६ जागा कौतुकास्पद नसल्या तरी नोंद घेण्याइतक्या आहेत. गेली काही वर्षे जिल्हाध्यक्ष नसलेल्या काँग्रेसला देवरूख, गुहागरमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.शहरी भागांवर शिवसेनेचे लक्षशिवसेना हा पूर्वी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे पाठबळ असलेला पक्ष मानला जात होता. मात्र, गेल्या काही नगर परिषद/पंचायत निवडणुकांमध्ये शहरी भागातही शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेने शहरी भागांमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असून, २०१९च्या विधानसभा निवडणुकांची ही तयारीच मानली जात आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण