शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:41 IST

कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप

खेड : कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मगरीस घटनास्थळानजीक अग्नी देऊन विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती येथील वनाधिकारी अनिल दळवी यांनी दिली. लोटे औद्योगिक वसाहतील रासायनिक कारखान्यातून परिसरातील खाडीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दयार्सारंग भोई विकास संघटना आक्रमक झाली आहे.नदी व खाड्यांमध्ये होणाऱ्या जलचर प्राण्यांच्या मृत्यूस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. मगरीच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दयार्सारंग भूमिका संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे.गेल्या सात महिन्यात मृत मगर आढळून येण्याची तिसरी घटना असून या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात वनविभाग प्रशासनास अपयश आले आहे. प्रशासनाला मगरींच्या मृत्यूचे काहीच गांभीर्य नाही का असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

आणखी किती मगरी बळी गेल्यावर प्रशासन जागे होऊन उपाययोजना करणार असा प्रश्?न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मृतावस्थेत आढळणाऱ्या मगरींच्या मृत्यू औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी सोडणारे कारखाने जबाबदार आहेत लवकरच सीईटीपीवर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवwater pollutionजल प्रदूषणRatnagiriरत्नागिरी