शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत शाळकरी मुलाचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:59 IST

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र तो बेपत्ता मुलाचा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत शाळकरी मुलाचा खून?मृतदेह पूर्णपणे सडल्याने ओळख पटलेली नाही

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे गावी एका शाळकरी मुलाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एक १४ वर्षीय मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मात्र तो बेपत्ता मुलाचा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.रत्नागिरीत शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी मिरजोळे येथे जंगलमय भागात आंब्याच्या बागेतील एका कामगाराला तीव्र घाणेरडा वास आला. त्याने आपल्या मालकाला याची कल्पना दिली.

त्याचा मालक घटनास्थळी आला. तेथे दगडांखाली काहीतरी झाकून ठेवण्यात आले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने तातडीने याची कल्पना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर या दगडांखाली एका मुलाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.मिरजोळे भागातील एक शाळकरी मुलगा गेले आठ दिवस बेपत्ता आहे. हा मृतदेह त्याचाच असल्याचा संशय आहे. मात्र, मृतदेह सडला असल्याने त्याबाबत लगेचच माहिती देणे अशक्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :MurderखूनRatnagiriरत्नागिरी