शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे  : अभिजीत घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:16 IST

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.

ठळक मुद्देसावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे  : अभिजीत घोरपडे रत्नागिरीतील बंदिवानांसाठीच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रभक्ती वाढीसाठी स्पर्धा

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई व रामचंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील कारागृहातील बंदिवानांसाठी निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रत्नागिरी कारागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, पतित पावन मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परूळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान कारागृहात असताना सोबत असलेल्या बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रूजवून त्यांच्यातून अनेक देशभक्त निर्माण केले होते. सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे त्यांचे विचार बंदिवानांमधून रूजवून आणि निबंधांतून ते उतरून त्यांच्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत करण्याचा उपक्रम निबंध स्पर्धेव्दारे आयोजित केला होता.

महाराष्ट्रातील येरवडा, मुंबई, ठाणे, नाशिक रोड, सातारा, भायखळा, रत्नागिरी कारागृहातील पुरूष व महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक घोषित करून विजेत्यांना रोख रकमेचे पारितेषिक, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर, डॉ. नारायण सावरकर यांच्या कन्या स्नेहलता साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह राजेंद्र वराडकर, मुकुंद गोडबोले, मंदाकिनी भट, सुमेधा मराठे, अशोक शिंदे, नयना शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक आर. आर. देशमुख यांनी केले. तुरूंगाधिकारी अमेय पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.दुचाकी रॅलीस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. मारूती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी फेरीला प्रारंभ झाला. ही फेरी मारूती मंदिर, जुना माळनाका, जयस्तंभ, बसस्थानक, आठवडा बाजार, काँग्रेस भुवन मार्गे टिळकआळी त्यानंतर शेरेनाका मार्गे लक्ष्मीचौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

टॅग्स :jailतुरुंगRatnagiriरत्नागिरी