शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मुख्य सचिवांनी घेतला विविध विभागांच्या शासकीय कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:15 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने ह्यटीमह्ण म्हणू काम केले पाहिजे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिल्या.

ठळक मुद्देमुख्य सचिवांनी घेतला विविध विभागांच्या शासकीय कामकाजाचा आढावाप्रत्येक विभागाने टीम म्हणू काम केले पाहिजे, सचिवांच्या सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने टीम म्हणू काम केले पाहिजे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिल्या.रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, जिल्हाधिकारी सभागृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जैन म्हणाले, आपल्या राज्याच्या एकूण बजेटचा विचार करता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त खर्च होत आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त शासकीय काम कशी करता येतील ते पहा.

यासाठी कार्यालयीन कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करा. यावेळी जिल्ह्यातील रिक्त पदांचाही आढावा त्यांनी घेतला. ते म्हणाले, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रामध्ये जेथे आपल्या पुढील पिढीचं भवितव्य अवलंबून आहे, त्या खात्यामध्ये रिक्त पदे भरणे गरजेच आहे आणि ती भरण्यासाठी आपण आवश्यक ती कार्यवाही करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. सातबारा संगणकीकरण, महसूल रेकार्ड स्कॅनिंग, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या २४ तास कार्यरत असलेल्या मदत कक्ष उपक्रम, शासकीय वसुली, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, रत्नागिरी - मिऱ्या- नागपूर महामार्ग चौपदरीकरण, जयगड - डिंगणी रेल्वे प्रकल्प आदीबाबतही त्यांनी माहिती दिली.जिल्हाधिकारी कार्यालय येथे येण्यापूर्वी दिनेशकुमार जैन यांनी मजगाव रोड विमानतळाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तटरक्षक दलाच्या कार्यालयाच्या भेट देऊन चर्चा केली. तटरक्षक दलाचे कमांडिंग आॅफिसर एस. आर. पाटील यांनी त्यांना माहिती दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तRatnagiriरत्नागिरी