शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

रत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 6:00 PM

फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपलाआयत्यावेळचा प्रवास झाला कठीणअनेक गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी ४०० वर

विहार तेंडुलकररत्नागिरी : फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.मे महिना हा सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक लोक सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. गेल्या काही वर्षात हे फॅड एवढे वाढले आहे की रेल्वे, बसेस फुल्ल होतातच; त्याशिवाय खासगी व्हॉल्वो तसेच खासगी वाहने घेऊनही अनेकजण कोकणात येतात. त्यामुळे कोकण हाऊसफुल्ल होते.कोकणात यंदा जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्यावेळी जर एखाद्या शहरातून मोठ्या शहरात फिरण्यासाठी जाण्याचा मनसुबा असेल, तर त्याला आता मुरड घालावी लागेल अथवा गर्दीतून लोंबकळत प्रवास करावा लागेल. अनेक रेल्वेगाड्यांची आरक्षण स्थिती पाहिल्यास आतापासूनच २०० ते ४००पर्यंत प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळे आयत्यावेळी प्रवास ठरवणाऱ्या पर्यटकांना रस्त्याद्वारेच प्रवास करावा लागणार आहे.मोठ्या उन्हाळी सुट्टीत पर्यटक कोकण आणि गोव्याला मुंबईपेक्षा अधिक पसंत करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अप् (मुंबई) मार्गावरील रेल्वेगाड्यांपेक्षा डाऊन (गोवा) मार्गावरील रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी आहे. मुलांच्या परीक्षा सुरु असल्याने सध्या गर्दीचे प्रमाण कमी आहे. काही पर्यटक कोकणात येण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंतचा कालावधी निवडतात. निकालानंतर अन्यत्र फिरणेही पसंत करतात.आरक्षणही बंद झालेरत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या मे महिन्यात फुल्ल असणार आहेत. तुतारी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन्ही आरक्षित डबे, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्या मे महिन्यात हाऊसफुल्ल असणार आहेत. नेत्रावती एक्स्प्रेसचे तर काही दिवसांचे आरक्षणही बंद झाले आहे. मांडवी एक्स्प्रेससाठी १५०पेक्षा अधिक तर गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेससाठी १६४ ते २४० एवढी प्रतीक्षा यादी आहे.प्रतीक्षा यादीमुंबईहून कोकणात येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुफानी प्रतिसादात धावणार आहेत. अनेक गाड्यांचे आरक्षण आतापासूनच पूर्ण झाले आहे. तेजस एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने प्रवास करण्यासाठी सध्या ६९ ते ११० एवढ्या मोठ्या प्रमाणात, मांडवी एक्स्प्रेस २९८ ते ३९७ तर ह्यकोकणकन्याह्णमध्ये तर ३९९ ते ४७० एवढी प्रतीक्षा यादी आहे.परदेशी पर्यटक कोटाही संपलाकाही रेल्वेगाड्यांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित कोटा असतो. हा कोटाही संपला असून, त्यामुळे मे महिन्यात देशी पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटक कोकणात किती प्रमाणात येतात, याचा अंदाज येईल.तेजस एक्स्प्रेसचा कोटाही फुल्लदेशातील सर्वात आलिशान रेल्वे असलेल्या तेजस एक्स्प्रेसचा आरक्षण कोटाही फुल्ल झाला आहे. केवळ पहिल्या आठवड्यात तेजस एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद सद्यस्थितीत त्यामानाने कमी आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून ते अगदी मे अखेरपर्यंत संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण पूर्ण झाले आहे.लांबपल्ल्याच्या गाड्यागरीबरथ, डबलडेकर या एक्स्प्रेस गाड्याही मे महिन्यात हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्यातील पहिल्या पाच दिवसात त्यामानाने गर्दी कमी आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये दिनांक ७, १४, २० व २१ मे या दिवसांचे आरक्षण थोड्या प्रमाणात शिल्लक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे