शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागाच्या तोट्यात निम्याहून घट-दोन कोटी ९३ लाख ४० हजाराने तोट्यात  घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:56 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला  फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे.

ठळक मुद्देसंपाचा फटका

रत्नागिरी :  राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला  फेब्रुवारी २०१८ मध्ये ६ कोटी ६७ लाख २५ हजाराचा तोटा सोसावा लागला होता. मात्र यावर्षी तो तोटा निम्यावर आला आहे. फेब्रुवारी १९ मध्ये ३ कोटी ७५ लाख ७५ हजाराचा तोटा झाला आहे. २ कोटी ९३ लाख ४० हजाराने तोटाम कमी झाला आहे. महामंडळाने कर्मचारी, अधिकाºयांचा अतिकालिक भत्यावरील खर्च कमी केला आहे. एक कोटी सहा लाखाचा अतिकालिक भत्ता कमी केला आहे. शिवाय जादा गाड्यांच्या नियोजनामुळे एक कोटीची उत्पन्नात भर पडल्याने तोटा कमी करण्यास हातभार लागला आहे.

रत्नागिरी विभागात आठशे गाड्या असून दिवसाला नऊ हजार फेºया सोडण्यात येतात. याव्दारे दर दिवशी लाखो प्रवाशांची वहातूक करण्यात येते. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जावून एसटी पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एसटी धावत असल्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. इंधन दरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळास तिकीट वाढ/भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे  एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होेत असल्याने महामंडळाकडून  दिवाळीसुट्टीत ‘हंगामी भाडेवाढ’ करण्यात आली होती. याशिवाय ‘प्रवासी वाढवा अभियान’, ‘मागेल त्याला एसटी’ यासारखे उपक्रम देखील राबविण्यात येत असतात. निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामुळे एसटीला उत्पन्न प्राप्त होत आहे. अवैध प्रवाशी वाहतूकीवर मात करण्यासाठी शटल फेºयादेखील सुरु केल्या आहेत. 

 प्रवासी खाजगी प्रवासी वहातूकीकडे वळण्यामागे एसटीचे बिघडलेले वेळापत्रक हे मुख्य कारण आहे. शिवाय स्वमालकीची वाहने वाढल्याने एसटीने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या  देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याशिवाय  ‘थेट भारमानाअभावी’  लांब पल्याच्या गाड्या बंद केल्यामुळेही महामंडळाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लांबपल्याच्या गाड्या बंद केल्याने त्या मार्गावरील प्रवासी संख्या घटत असून खाजगी वहातूकीकडे वळत आहे.

 रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये २६० कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते.  (२०१७-१८) मध्ये   २५६ कोटी ८२ लाख ८७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. दोन वर्षात तब्बल ३ कोटी ७९ लाख १२ हजार रूपयांनी उत्पन्न घटले होते. २०१८-१९ चे उत्पन्न काढण्याचे काम सुरू आहे. परंतु फेब्रुवारीमध्ये तर उत्पन्नात कमालीचा फरक आहे.

टॅग्स :state transportएसटीMONEYपैसा