शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :गणेशोत्सवातही रिफायनरी विरोधाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:20 IST

नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविविध ठिकाणी उभारले देखावे विविध सण, समारंभांमध्येही प्रकल्पाचा विरोध येतोय उफाळून

राजापूर : नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.मागील काही महिने नाणारमधील रिफायनरी प्रकल्पावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. स्थानिक पातळीपासून ते मंबई, दिल्लीपर्यंत हादरे देण्याचे काम या प्रकल्पाविरुध्द आंदोलनांमधून सुरू आहे. प्रकल्प परिसरातील चौदा गावांतील जनतेची तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्पच रद्द करा, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

पण शासन मात्र हा प्रकल्प रेटून नेण्याच्या तयारीत असल्याने सुरु असलेला संघर्ष अधिकच पेटत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष विरहित ही आंदोलन करून प्रकल्पग्रस्तांनी एकजूट दाखवून दिली आहे.केंद्र्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवगळता उर्वरित राजकीय पक्ष रिफायनरीविरोधात उभे ठाकले आहेत. तरीही शासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संतप्त जनतेने आपला लढा व्यापक बनविला असून, मागील काही महिने कोकणात साजऱ्यां झालेल्या काही सणांदरम्यान नाणार विरोधाचे दर्शन घडले होते.यापूर्वी होळी सणादरम्यान रिफायनरी प्रकल्पाची होळी पेटवताना शासनाचा निषेध म्हणून बोंबा मारण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर रिफायनरीविरोधात काळ्या गुढ्या उभारुन विरोध व्यक्त करण्यात आला होता. आषाढी एकादशीच्या दिवसात सागवे परिसरात, तर मुंबईत प्रकल्पविरोधात दिंड्या काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी सणाच्या दिवशी प्रकल्पाविरोधी नारा देण्यात आला होता.गणपती उत्सवात रिफायनरीला विरोध करणारे देखावे ठिकठिकाणी बनविण्यात आले आहेत. यामध्ये प्रकल्पाची घातकता, पूर्वीचे कोकण व रिफायनरी प्रकल्प मार्गी लागल्यानंतरचे कोकण याची तुलना करणारे वास्तव दाखविले गेले आहे. रिफायनरीविरोधी देखाव्यांसह बॅनरबाजी व रांगोळीतून प्रखर विरोधाचे दर्शन घडविले गेले आहे. सागवेतील भूमिकन्या एकता मंचाच्या वतीने प्रकल्पविरोधातील जनजागृती करणारी काढण्यात आलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.विघ्नांचे हरण करणाऱ्या गणराया, आता तूच आमच्या कोकणावर आलेले हे विघ्न तत्काळ दूर कर व निसर्गरम्य कोकण वाचवह्ण, अशी आर्त साद घालणारे बॅनरही लक्षवेधी ठरले आहेत. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी