शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

Ratnagiri: रिफायनरी विरोधक नेत्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:01 IST

Ratnagiri Refinery News: रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना भडकावत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली आहे. दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- अरुण आडिवरेकर

रत्नागिरी - शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पावले उचलली जात आहेत. बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना भडकावत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली आहे. दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रस्तावित भू सर्वेक्षणला विरोध करण्यासाठी  स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडियाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी शनिवारी (२२ एप्रिल) सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा मंगेश चव्हाण या दोघांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १५३(१) प्रमाणे ताब्यात घेतले. तसेच ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम १५१(३) प्रमाणे रविवारी (२३ एप्रिल) रात्री उशिरा राजापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश केले आहेत.

बारसू परिसरात होणाऱ्या भू सर्वेक्षणाला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रिफायनरी परिसरात जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय