शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:29 IST

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर होता.

ठळक मुद्देमहत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वनपेट्रोलचा असलेला दर गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च दर होता.मागील वर्षी याचदिवशी म्हणजे ३ एप्रिलला रत्नागिरीत पेट्रोलचा दर ७३.६९, तर डिझेलचा दर ६१.४३ एवढा होता. त्यानंतर वर्षभराने म्हणजे यावर्षी ३ एप्रिलला हाच दर ८२.७० आणि डिझेलचा दर ६८.८७ प्रतिलिटर एवढा आहे. त्यामुळे वर्षभरात पेट्रोलने ९.०१ रुपयांनी उसळी मारली आहे, तर डिझेल ७.४४ रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षभरात केवळ चार वेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले. उर्वरित वेळा हे दर वाढतच आहेत.दि. २५ मार्च रोजी रत्नागिरीत पेट्रोल ८१.५६, तर डिझेल ६७.७२ रूपये प्रतिलीटर दराने विकले जात होते. मात्र, ३ एप्रिल रोजी पेट्रोल ८२.७०, तर डिझेल ६८.८७ रुपये दराने विकले जात होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसात या दरात अनुक्रमे १.१४ व १.१५ रुपयांची वाढ झाली आहे. वर्षभरात ९ रुपयांची वाढ झाली असली तरी गेल्या चार महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त भडकल्याचे दिसून येते. हा भडका आता रत्नागिरीकरांच्या चांगलाच जिव्हारी लागत आहे.रत्नागिरीनजीकच्या जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोलचे भाव अधिक भडकल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी वाढत असल्याने सामान्य रत्नागिरीकरांना वाहन परवडेनासे झाले आहे. वारंवार वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे आता जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढणार असून त्यामुळे सामान्यांना जिणे नकोसे होणार आहे.सर्वाधिक वाढ रत्नागिरीतरत्नागिरीपेक्षा पेट्रोलचे सर्वाधिक दर हे नांदेड, अकोला या जिल्ह्यात असले तरी पेट्रोलमध्ये गेल्या वर्षभरात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीत मोठी वाढ झाली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरात जास्तीत जास्त ७ रुपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरीत ही वाढ ९.०१ रुपयांची आहे. त्यामुळे रत्नागिरीत झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीतील फरक दिसून येतो.जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणारपेट्रोल, डिझेलच्या भडकलेल्या दरामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी येणारा भाजीपाला हा ९० टक्के कोल्हापूर, सातारा येथून येतो. सध्या भाज्यांचे दर हे स्थिर असले तरी वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमुळे ते वाढण्याची शक्यता आहे. वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने हे दर वाढणार आहेत.महत्त्वाच्या शहरांमधील मंगळवारचे दरशहर                    पेट्रोल                 डिझेलकोल्हापूर               ८१.८४            ६८.0८सिंधुदुर्ग                 ८२.६६           ६८.८४रत्नागिरी               ८२.७०          ६८.८७सातारा                   ८१.९९          ६८.३०मुंबई                      ८१.८०           ६८.८९पुणे                        ८१.६७            ६७.८६

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPetrolपेट्रोल