शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र, भाजपविरोधी प्रचार करणार : वालम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:06 IST

महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र, भाजपविरोधी प्रचार करणार : वालममहाराष्ट्रभर संपर्क अभियान, विरोधकांना मदत करू

रत्नागिरी : महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजापूर नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही भाजपच्या उमदेवाराविरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.रिफायनरी प्रकल्पाला भाजपचा पाठिंबा असल्याने भाजपविरोधातच आता आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगिले. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सरकारकडून त्रस्त, दु:खी असलेले शेतकरी व इतर संघटना यांच्या गाठीभेटी आमच्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेतर्फे, संपर्क अभियानमार्फत घेण्याचे सुरू केले आहे.

आता आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे भाजपविरोधात रान उठवणार, भाजपवाले कसे खोटे बोलून जनतेला फसवतात, ते लोकांपर्यंत तोंडी तसेच लेखी पत्रकांच्या माध्यमातून पोहोचून पटवून देण्यात येणार असल्याचे वालम यांनी सांगितले.त्यांनी सांगितले की, भाजपच्या फसव्या उमेदवाराला मतदान करू नका अन्यथा भविष्यात तुमच्या पदरी फसवणुकीशिवाय काहीच मिळणार नाही. कोकणी जनतेचा रिफायनरीला विरोध असतानाही केंद्रापासून राज्यातलेही प्रमुख भाजप नेते सौदी अरेबिया, आबुधाबी यांच्या सुलतानाला कोकण विकायचा कट रचला आहे.

नाणार रिफायनरीसाठी पहिली १६ गावातील १५ हजार एकर जमीन नंतर पुन्हा रिफायनरीला धरण नावाखाली त्याला लागूनच खाडी किनाऱ्याच्या २५ गावांतील ११ हजार एकर जमीन देण्याचे मान्य केले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांना कोकणातील किंवा महाराष्ट्रातील जनतेचे काहीही सुख-दु:खाचे पडले नसल्याचे वालम यांनी सांगितले आहे.सभागृह बंद पाडणारनागपूर येथे पावसाळी अधिवेशनात दिनांक ११ जुलै रोजी उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी सभागृहाचे काम बंद पाडण्यासाठी सर्व पक्षाच्या आमदारांना विनंती करण्यात आली आहे. आमदारांनी त्याला सहमती दर्शवली असल्याचेही वालम यांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीBJPभाजपा